मॅक्स महाराष्ट्रने रोखला बालविवाह, नवरदेवासह ५ जणांवर गुन्हा

Update: 2021-03-03 09:59 GMT

कोरोना संकटाच्या काळात राज्यात बालविवाह वाढल्याची चर्चा सुरू आहे. शासकीय पातळीवर असे बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही अनेक ठिकाणी लपूनछपून तर काही ठिकाणी उघडपणे असे बालविवाह पार पाडले जात आहेत. आदिवादी पाडे, वैदू समाजाच्या वस्त्या आणि बंजारा तांड्यांमध्ये बालविवाहाच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. पण आता चक्क मुंबई जवळ असलेले आणि कुटीर उद्योगाची नगरी म्हणून ओळख असणाऱ्या जाणाऱ्या उल्हासनगर बाल विवाहाचा प्रकार उघडकीस आला आहे. बौद्ध पद्धतीने हा विवाह लावण्याचा प्रयत्न सुरू होता.

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रच्या ऑफिसला याच कुटुंबातील एका जागरूक नातेवाईकाने फोन केला करुन यासंदर्भात माहिती दिली. एका 13 वर्षांच्या आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विवाह अंबरनाथ येथील 27 वर्षाच्या तरुणासोबत रचला जात आहे, तरी तुम्हाला विनंती आहे की काहीही करुन हा विवाह रोखावा, यानंतर मॅक्स महाराष्ट्रने तातडीने विठठलवाडी पोलीस स्टेशनला संपर्क साधला. आणि लीस निरीक्षक कनहैया थोरात यांनी तातडीने कारवाई केली आणि लग्नाचा विधी सुरू असतानाच तिथे जाऊन कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी नेमकी कशी कारवाई केली?

पोलीस लग्नाच्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत लग्न लागले होते. पण पोलीस त्या ठिकाणी आल्याचे पाहून लग्नाच्या ठिकाणी गोंधळ उडाला. पण मुलीच्या घरच्या लोकांनी सुरुवातीला लग्न झालेच नाही, हा साखरपुडा होता, फोटोग्राफर नव्हता, फोटो मोबाईलमध्ये काढलेच नाही असा दावा करत फोटो देण्यास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा जन्म दाखला, आधार कार्डही पालकांनी पोलिसांना दाखवले नाही. शेवटी पोलिसांनी मुलगी ज्या शाळेत शिकली त्या शाळेतून दाखला मिळवला तेव्हा त्या मुलीचे मुलीचे वय अवघे 13 वर्ष 2 महिने इतकेच होते.

कुणाकुणावर गुन्हे दाखल

नवरा मुलगा - अभिजित गौतम राजगुरू (वय - 27)

मुलाची आई - सुनीता राजगुरू

मुलाचे वडील - गौतम त्र्यंबक राजगुरू

मुलीची आई - सविता देवकर

मुलीचे वडील - राहुल भानुदास देवकर

या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील बालविवाहांसंदर्भात सातत्याने वृत्तांकन करुन आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून मॅक्स महाराष्ट्रने जनजागृती सुरू ठेवली आहे. यासंदर्भातले नियम काय आहेत आणि बालविवाह होत असेल तर एक जागरुक नागरिक म्हणून आपणही यासंदर्भातली माहिती पोलिसांनी देऊ शकता.

Tags:    

Similar News