#MaxMaharahtraImpact​ : अखेर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील जेवणाचा प्रश्न सुटला

जनसामान्यांचे आणि वंचितांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा कऱणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रच्या आणखी एका बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे.;

Update: 2021-02-06 14:00 GMT

जनसामान्यांचे आणि वंचितांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा कऱणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रच्या आणखी एका बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. मॅक्समहाराष्ट्रने ४ फेब्रुवारीला मुंबईमधील चेंबूर येथील संत एकनाथ मुलांचे शासकीय वस्तीगृहाच्या अनास्थेबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. मॅक्समहाराष्ट्रच्या बातमीची दखल समाज कल्याण विभागाच्या मुंबई उपनगरचे सहाय्य्क आयुक्त प्रसाद खैरनार यांनी घेतली आहे. त्यांनी ५ फेब्रुवारीलाच संत एकनाथ मुलांच्या शासकीय वस्तीगृहाला भेट दिली. वस्तीगृहाची पाहणी करून जेवणाची व्यवस्था लवकरात लवकर करून देऊ असे आश्वासन दिले. "भोजन पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी ऐनवेळी नकार कळवल्यामुळे आम्ही दुसऱ्या भोजन पुरवठादाराची व्यवस्था केली आहे. ६ फेब्रुवारीपासून जेवणाची सोय विद्यार्थ्यांसाठ केली आहे. विद्यार्थ्यांच्या इतर गैरसोंयीच्या बाबतीत दखल घेऊन त्यावर कारवाई पूर्ण केली आहे."असे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं.

४ फेब्रुवारी : ही बातमी पाहू शकता  #Groundreport : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 'सामाजिक न्याय' कधी?

"मॅक्समहाराष्ट्रने इथे येऊन ग्राऊंड रिपोर्ट केला. बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पोहचल्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय लोकांचे कॉल येऊ लागले. बातमीमुळे अधिकाऱ्यांवर दबाव येऊन तत्काळ दखल घेतली गेली. जी गोष्ट महिन्याभरानंतर होणार होती ती तत्काळ दुसऱ्या दिवशी सुरु झाली. याचं खरं श्रेय आम्ही मॅक्समहाराष्ट्रला देतो. आमची होणारी उपासमार आणि गैरसोयीबाबत मॅक्समहाराष्ट्रने आवाज उठवला आणि जनतेपर्यंत पोहचवला. मॅक्समहाराष्ट्रच्या बातमीमुळे मुंबई उपनगरचे सहाय्य्क आयुक्त वस्तीगृहात आले आणि दुसऱ्या दिवसापासून जेवणाची सोय करून दिली जाईल असं आश्वासन दिलं." अशी प्रतिक्रिया विकाश शिंदे यांनी दिली आहे.



ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वस्तीगृहाला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल विचारपूस केली. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई सरचिटणीस स्नेहल कांबळे यांनी मॅक्समहाराष्ट्रची बातमी पाहिल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क करून विद्यार्थ्यांची होणारी उपासमार आणि गैरसोयीबाबत माहिती दिली. दुसऱ्या दिवशी या वसतीगृहाला त्यांनी भेट दिली. ही बातमी मॅक्समहाराष्ट्रने प्रसिद्ध केली याबाबत त्यांनी मॅक्समहाराष्ट्रचे आभार मानले.


राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक विभागाचे मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार आणि अल्पसंख्यांक विभागाचे मुंबई उपाध्यक्ष जावेद मेमन यांच्या टीमने या वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली.


Full View
Tags:    

Similar News