#MaxMaharashtra Impact : लॉकडाऊनची भीती दाखवून शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर होणार कारवाई

Update: 2021-03-04 12:30 GMT

पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती शेतकऱ्यांना दाखवत त्यांच्याकडून कमी दरात द्राक्ष खरेदी केली जात असल्याचे वृत्त मॅक्स महाऱाष्ट्रने दाखवले होते. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांची द्राक्ष व्यापाऱ्यांनी कमी दरात खरेदी केली होती. यासंदर्भातली बातमी मॅक्स महाराष्ट्राने गेल्याच आठवड्यात दाखवली होती. या बातमीची दखल घेऊन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी लॉकडाऊनची दहशत दाखवून शेतकऱ्यांचा कमी भावात घेणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे.

लोकडाऊनचे कारण देत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जर कमी दर देऊन खरेदी केली तर कारवाई केली जाईल, तसेच कोरोना व लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातून पण काही द्राक्षे बागा राहिलेल्या आहेत. त्या द्राक्ष बागांच्या पिकांना चांगला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी अतोनात दिवस-रात्र कष्ट करून ते पिक वाढवले आहे. मात्र आता त्यांना अतिशय तुटपुंज्या दराने द्राक्षे विकावी लागत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. लॉकडाऊनच्या अफवा परसवू नका पण कोरोनाचा संसर्ग परसणार नाही यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनीटायझर ही त्रिसुत्री लक्षात ठेवा असे आवाहनही जिल्हाधिऱ्यांनी केले आहे.

Full View


Tags:    

Similar News