MAX MAHARASHTRA IMPACT : इंदिरानगरमधल्या रहिवाशांच्या घरातील अंधार मिटला

Update: 2021-08-30 15:15 GMT

सांगली : जिल्ह्यातील तासगाव शहरातील इंदिरानगरमध्ये गेल्या अनेक दिवसापासून वीज पुरवठा हो नव्हता. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने दोन दिवसापूर्वी इथल्या नागरिकांच्या व्यथा मांडल्या होत्या. झोपडपट्टीमधून पक्क्या घरांमध्ये आले तरी या लोकांचे हाल संपत नव्हते. इथल्या नागरिकांना पाणी, वीज, स्वच्छता अशा सुविधाच मिळत नसल्याचे वास्तव मॅक्स महाराष्ट्रने मांडले.

या वृत्ताची तासगाव नगरपालिकेने तातडीने दखल घेतली आणि आता या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात लाईट जोडणी दिली आहे. इथल्या लोकांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी नगरपालिकेने वीज वितरण विभागाल जोडणीसाठी मनाई केली होती. पण इथल्या लोकांचे काय हाल होत आहेत हे मॅक्स महाराष्ट्रने मांडल्यानंतर

नगरपालिकेने वीज जोडणी करण्यासाठीचे पत्र महावितरण विभागाला पाठवले आणि महावितरण विभागाने त्वरित लाईट जोडणी सुरू केली आहे. सोमवारी या ठिकाणी लाईट जोडण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात इंदिरानगर झोपडपट्टी येथील नागरिकांनी मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानले. पण देण्यात आलेले लाईट कनेक्शन हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे, ते आता कायमस्वरूपी करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 2013 मध्ये इंदिरानगरमधील झोपडपट्टीतील लोकांसाठी दिवंगत आर.आर.पाटील यांच्या प्रयत्नांनी घरकुल योजना मंजूर झाली होती. पण त्यानंतर या योजनेअंतर्गत झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. इथल्या नागरिकांना सर्व सुविधा कायम स्वरुपी मिळण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.

Full View

Tags:    

Similar News