Max Maharashtra Impact : दरडग्रस्तांची दिवाळी गोड, अखेर घरात वीज पुरवठा सुरू

Update: 2021-11-05 10:00 GMT

मेन स्ट्रिम मीडियाने दुर्लक्ष केलेल्या घटकांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी यंत्रणेकडे पाठुरावा करणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रच्या आणखी एका बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरामध्ये घडलेल्या नैसर्गिक आपत्तीला दोन महिने उलटून गेले आहेत. या कालावधीमध्ये सरकारने ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी या गावांमधील दरडग्रस्त कुटुंबातील लोकांना तात्पुरत्या स्वरूपाचे निवारा शेड कोयनानगर परिसरामध्ये बांधून दिले आहेत.

मात्र या निवारा शेडमध्ये सोयी सुविधांचा अभाव होता. लाईट, पाणी या महत्वाचा सुविधांअभावी इथल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भातले वृत्त मॅक्स महाराष्ट्रने १ नोव्हेंबर रोजी दिले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी,स्थानिक प्रशासन यांच्याकडे नागरिकांनी तक्रार करुन घेतली तरीही याकडे कुणी लक्ष देत नव्हते. मात्र मॅक्स महाराष्ट्र त्या ठिकाणी पोहोचून तेथील परिस्थिती दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने इथे आता वीज पुरवठा सुरू केला आहे. मॅक्स महाराष्ट्रने यासंदर्भात साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी प्रश्न विचारल्या नंतर त्यांनी दोन दिवसात लाईट पाणी जोडणीचे काम पूर्ण होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे दोन दिवसात या निवारा शेडमध्ये वीज आणि पाणी पुरवठा सुरू झाला आहे. यामुळे ऐन दिवाळी अंधारात जाण्याची भीती असलेल्या या लोकांच्या घरात दिवाळी वीज आली आहे.

सर्वत्र बेंदूर सणाची तयारी चालली असताना मुक्या प्राण्याला देखील माहीत न्हवतं आज आपला हा शेवटचा सण आहे.रात्रभर सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता अशात अचानक डोंगरांचे काही भाग तुटून थेट डोंगर पायथ्याशी असलेल्या घरांवरती कोसळले यात दावणीला असलेल्या मुक्या जनावरांन सह घरातील लोक या घटनेचे बळी ठरले बाहेर अंधार काळोख यात कसेबसे आरडाओरडा करत बाहेर आले.गावकऱ्यांचा मदतीने अनेकांचे प्राण वाचले मात्र पशुधन वाचवण्यास कोणालाही जमले नाही लालमाती त्यात चिखलाचा प्रवाह कसेबसे झाडाचा फांद्यांना पकडत बाहेर पडली नजीक असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवावे तर बाहेर मुसळधार पाऊस नदी ओढे नाले तुडुंब बहरून वाहत होते अशात रात्र काळोख्यात काढावी लागली आपलीच रक्ताची डोळ्यादेखत गाडली गेलेचे चित्र डोळ्यासमोर आल्यावर हुंदके मारत असरूंचा धारा डोळ्यातून खाली पडत होत्या रात्र कशीबशी संपला दिवस सुरु झाला मिळेल त्या मार्गाने प्रत्येक जण उपचार गावातील लोकांसमवेत तालुक्याचा ठिकाणी जाऊ लागली.यात खरी मदत गावकरी यांनी केली .सातारा जिल्ह्यातील पाटण तालुखा हा भौगोलिक दृष्ट्या दुर्गम तालुका असल्याची ओळख आहे नदी नाले ओढे यांचा शेजारी वसलेली ढोकवले.आंबेघर.मिरगाव हुंबरळी ही गावे या नैसर्गिक प्रकोपाची बळी ठरली प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासन पोहचत होते दरड गृहस्थ यांना भेट देऊन आपली जबाबदारी पूर्ण करत होती.


दरडगृहस्थ कुटुंबाना प्रशासनाने तात्पुरती स्वरूपाची सुरक्षित ठिकाणी हलविले यात गावातील प्राथमिक शाळा यामध्ये अपुऱ्या सोई सुविधान अभावी लाईट विना गॅस यावर दरडगृहस्थ आपला उदरनिर्वाह भागवत होती सरकारी काम आणि हातभार लाम या प्रमाणे एखादी जीवन उपयोगी वस्तूंची गरज असल्यास ती सरकारी वेळेत पोहोचत होती खरी मदत मिळाली ती प्रसारमाध्यमे यांचा कामाची माध्यमातून प्रसारित झालेल्या बातम्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचे हात पुढे येऊ लागले यात अंगावरचा कापड्यापासून झोपण्याचा निवाऱ्यापर्यंत सर्व मदत पोहोचली सरकारी मदतीपेक्षा इतर मदत दारांनी केलेली मदत दीर्घ काळ टिकली यामुळे आम्हाला जगता आले असल्याचे मत दरडग्रस्थ सांगतात आरोग्याचा सुविधांचा वानवा असलेल्या तालुक्यात आशा आपात्कालीन वेळेला आधार मिळेल असे वाटले मात्र उपचाराविना काहींना आपले जीव गमवावा लागले आहेत.

सरकारी मदत

आपत्तीगृहस्थ कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची घोषित केली त्यानंतर एक महिना उलटून गेला तरी तात्काळ या शब्दाचा अर्थ दरडग्रस्थाना समजत नव्हता आशा वेळी मॅक्स महाराष्ट्र ने तहसीलदार यांना या सर्व प्रकारची विचारणा केल्यावर त्यांनी आम्ही पैसे बँकेकडे वर्ग केले असल्याचे बोलले गेले मात्र आम्ही पुन्हा बँकेत गेल्यावर cheq आला नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले हा cheq तयार होता मात्र कर्मचाऱ्यांचा हलगर्जी पणामुळे तो तहसिलकार्यलयात अडकला होता मॅक्स महाराष्ट्राचा पाठपुराव्यानंतर ती रक्कम पुन्हा लाभार्थ्यांचा खात्यावर्ती वर्ग झाली .

आता सर्व काही बरे चालले असताना सरकारी जिल्हापरिषदचा शाळेत वास्तव्यास असलेल्या दरडग्रस्थाना अचानक शाळा सुरू होणार असल्याचे बोलले गेले आणि पुन्हा या दरडग्रस्तांचा निवार्याचा प्रश्न गंभीर झाला अशात सरकारने आपल्या डोक्यावरचे खांद्यावर घेण्यासाठी कोयनानगर येथील प्रोजेक्ट चा शासकीय जागेवर्ती तात्पुरती निवाराशेड बांधण्यास सुरवात केली कोणतीही परवानगी कोणत्याही खात्याकडून न घेता ही प्रक्रिया सुरू झाली एका महिन्यामध्ये निवारा शेड तयार झाली परंतु लाईट स्वछ पाणी या सुविधांचा वानवा होता अनेक दिवस सरकारी कार्यालयांचे हुबरे झिजविल्यानंतर कसेबसे रूम मिळाली मात्र या रूम मध्ये ना लाईट ना पाणी जे पाणी होते ते कोणी शौचालयाला देखील वापरणार नाही अशा स्वरूपाचे लाल मातीचा खच असलेले लाईट चा अभाव हळूहळू उन्हाचा तडाखा लागत होता.अबाल वृद्ध घरात राहत होती ना गॅस ना लाईट या सुविधांनी दरग्रहस्त व्यापले असतांना ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला होता. घरात लाईट दिवाळी पूर्वी येईल आणि सरकार दरडग्रस्थानची दिवाळी गोड करेल असे वाटले होते मात्र सरकार याकडे लक्ष लावत न्हवते अशात मॅक्स महाराष्ट्र यांनी यासंधर्भात जिल्हाधिकारी. प्रांताधिकारी. तहसीलदार.प्रकल्प वीज वितरण कार्यालय यांना यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी दोन दिवसात लाईट जोडणी करू घेतो शब्द दिला आणि दोन दिवसाने घरात लाईट पेटली त्यानंतर दरडग्रस्थ लोकांनी मॅक्स महाराष्ट्राचे आभार मानले.

पंचनाम्याचा सरकारी सावळागोंधळ

या भूस्खलनात मोठया प्रमाणात शेतीचा नुकसाणीबरोबर अंगणात उभे असलेल्या एक अपंग व्यावसायिकाचा वाहनांचे नुकसान झालेले असताना अनेक वेळा शासकीय अधिकारी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी लुमाजी लक्षीमन कोळेकर या अपंग व्यावसायिकाला पंचनामा करतो असे आश्वासन दिले मात्र अद्याप आज पर्यंत कोणत्याही प्रकारे या व्यावसायिकाचा वाहनांचे पंचनामे केले नाहीत.या एक हात नसलेल्या अपंग व्यावसायिक याचे उपजीविकेचे एकमेव साधन असलेले वाहन भूस्खलनात अडकल्यामुळे आज त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे याकडे कोणाचेही लक्ष नसल्याची खंत दरडग्रस्थाना वाटत आहे. मात्र आज ही दरडगृहस्थ गावांचा पुनर्वसनाचा तिढा अजून सुटलेला नसल्याचे दिसून येत आहे.अजून देखील दुसऱ्या टप्प्यात निवारा शेड चे वाटप करण्यात आलेले नाही यावरून आपणाला समजत असेल की या तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्था कशा पद्धतीने चालू आहे .या सर्व घटनेकडे मॅक्स महाराष्ट्र यांचा पाठपुरावा चालू आहे.


Full View

Tags:    

Similar News