मॅक्स महाराष्ट्र इम्पॅक्ट : कराड - चिपळूण मार्गाच्या कामाला सुरूवात
मॅक्स महाराष्ट्रच्या आणखी एका बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेची बातमी मॅक्स महाराष्ट्रने दाखवल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे.
पश्मिच महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कराड-चिपळूण मार्गाच्या दूरवस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट मॅक्स महाराष्ट्रने दाखवल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. आता या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. कोकणात जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कराड चिपळूण राज्य महामार्गाची दूरवस्था आहे.
कराड चिपळूण मार्ग हा कोकणात जाण्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. या रस्त्याचे काम तीन टप्यात सुरू आहे. पहिला टप्पा हा गुहागर ते पोफळी आहे तर दुसरा टप्पा पोफळी ते संगमनगर आहे आणि संगमनगर ते कराड हा तिसरा टप्पा आहे. यातील दोन टप्यांचे काम सुरू आहे. पण तिसऱ्या टप्प्याच्या कामाचे टेंडर निघाले नसल्याने काम थांबले होते. पण मॅक्स महाराष्ट्रने या रस्त्याच्या दूरवस्थेचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने यंत्रणा हलली आणि कामाला सुरूवात झाली आहे.