Max Maharashtra Impact: अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत...!
बीड जिल्ह्यात गेल्यावर्षी तब्बल सोळा वेळा अतिवृष्टी झाली होती आणि याच दृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं होतं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या सोयाबीन,कापूस ,बाजरी,उडीद,तुर,मुग या सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झालं होतं नुकसान झाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी हताश झाला होता, याच कारणाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या...
गेल्या वर्षी याविषयी मॅक्स महाराष्ट्रने बातम्या दाखवण्याचा प्रयत्न केला होता, अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा मॅक्स महाराष्ट्रने संपूर्ण देशाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि तब्बल एक वर्ष उलटून गेले तरीही या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली नव्हती.
याच्याविषयी मॅक्स महाराष्ट्रने 1 ऑक्टोबर 2022 रोजी बातमी प्रसारित केली होती आणि त्यानंतरही शासनाने याची दखल घेतली. यामध्ये जिल्ह्यातील शाहिद पटेल अशोक भूतनाथ बाबासाहेब बुधनर या शेतकऱ्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती.
याचीही बातमी मॅक्स महाराष्ट्र ने 15 ऑक्टोबर 2022 रोजी दाखवली होती आणि याची दखल घेत शासनाने 19 ऑक्टोबर 2022 रोजी शासन परिपत्रक जारी करत बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तब्बल 40 कोटी रुपये मदत जाहीर केली आणि काही दिवसातच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी न्यायालयात धाव...!