मॅक्स महाराष्ट्र इम्पॅक्ट : त्या आदिवासी पाड्यांवर पोहोचली आरोग्य यंत्रणा

सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष कऱणाऱ्या यंत्रणांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीने आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील ज्या पाड्यांमधीस लोकांना रस्ता नव्हता तिथे आता आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे.;

Update: 2020-10-15 05:56 GMT

देशाची आर्थिक राजधानी मुबंईला लागून असलेल्या आणि जव्हार पासून 25 ते 30 किमी अंतरावरील डोंगर दरी खोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही सोयीसुविधा पासून कोसो दूर आहेत. पण मॅक्स महाराष्ट्रने त्यांच्या या वेदना मांडल्यानंतर शासकीय यंत्रणेपासून लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत तातडीने कारवाईला सुरूवात केली आहे.

 



 7 किमीचा डोंगर गरोदर माता कशी पार करणार?

स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटूनही अद्याप या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्याचा सामना करावा लागत आहे. रस्त्याअभावी अबाल वृद्ध, गरोदर माता, शाळकरी मुले चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आजारी पेशंट झाल्यास लाकडाची डोली करून 6 ते 7 किमीचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील आरोग्य पथक गाठावे लागते परंतु वेळीच उपचार न मिळाल्याने येथील अनेक पेशंट दगावले देखील आहेत परंतु याबाबत मॅक्समहाराष्ट्र ने "गरोदर माता 7 किमीचा डोंगर कसा पार करणार" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच शासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले खासदार राजेंद्र गावित यांनी 30 सप्टेंबर रोजी या पाड्याना भेट दिली व येथील परिस्थिती चा आढावा घेतला तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून हा रस्ता पुढच्या वर्षापर्यंत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे परंतु येथील आरोग्याचा ज्वलंत प्रश्न विचारत घेऊन




 तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन मनमोहाडी ह्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.या सुविधेमुळे दर गुरुवारी आरोग्य कर्मचाऱ्यांकडुन येथील पाड्यांवरील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे येथील रूग्णांची डोली यात्रा थांबणार असुन येथेच त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे साकुर प्राथमिक आरोग्य केद्रांचे कर्मचारी दर गुरुवारी जाऊन आरोग्य सेवा देणार आहेत असे डाँ.संजय लोहार यांनी सांगितले तसेच या आदिवासी पाड्यावरील अनेकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत यामुळे येथिल आदिवासींनी समाधान व्यक्त करून मॅक्समहाराष्ट्र चे आभार मानले आहेत.

१ मंत्री २ खासदार.. २ गावांचा 'वनवास' कधी संपणार?



Tags:    

Similar News