विद्यापीठ नामांतरासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या आई-मुलीचा जगण्यासाठी संघर्ष
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी झालेल्या आंदोलनात अनेकांनी आपले सर्वस्व पणाला लावले. याच मागणीसाठी २७ वर्षांपूर्वी आपल्या तान्ह्या मुलीला मुख्यमंत्र्यांच्या गाडीपुढे फेकून देणाऱ्या एका आईचा जगण्यासाठी संघर्ष सुरू पाहा, पाहा आमचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा स्पेशल रिपोर्ट....;
सत्तरच्या दशकात मराठवाड्यात एक महत्वाचा मुद्दा धगधगत होता, तो म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा या काळात मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी दलित समाज रस्त्यावर उतरला होता...याचदरम्यान, फेबु्रवारी १९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील मंत्रिमंडळाने राज्यातील कोणत्याही संस्थेचे नाव न बदलण्याचा ठराव घेतला....त्यामुळे हे आंदोलन अधिकच पेटलं....हे सर्व घडत असताना वसंतदादा पाटील यांचा औरंगाबाद दौरा ठरला होता....
त्यामुळे वसंतदादा पाटील यांना भारतीय दलित पँथरने निवेदन देण्याचं ठरवलं... पण, हजारो आंदोलकांना टाळून वसंतदादांचा ताफा पुढे निघाला....यामुळे आंदोलक आक्रमक झाले... पण ताफा काही थांबायला तयार नव्हता... याचवेळी औरंगाबादच्या जमुनाबाई अप्पा गायकवाड या महिलेने आपल्या काखेतील दोन-तीन महिन्यांच्या चिमुरडीस ताफ्यातील मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर फेकले.... आणि काही क्षणातच मुख्यमंत्र्यांचा ताफा जागेवरच थांबला....
ज्या आपल्या पोटच्या मुलीला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीपुढे फेकलं होत त्या चिमुरडीला म्हणजेच संगीताला कायमचे अपंगत्व आले आहे... बाबासाहेबांच नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी संघर्ष करणाऱ्या या दोन्ही मायलेकी आज शहरातील गुलमंडीवर भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह चालवत आहे.. त्यांना आतापर्यंत अनेकांनी मदतीची आश्वासनं दिली खरी पण प्रत्यक्षात ती काही पूर्ण झालेली नाहीत. औरंगाबाद शहर पातळीवर असलेला हा लढा पँथरने अल्पावधीत मराठवाड्यातील गावोगावी नेला...
त्यात जनाबाईसारख्या अनेकांनी या लढ्यासाठी आपलं सर्व काही पणाला लावून संघर्ष कायम ठेवला होता... मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आंबेडकरी अस्मितेच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या घरादाराची राखरांगोळी करीत,लढा कायम ठेवला...आणि याच लढयामुळे अखेर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळालं.