जरंडेश्वर साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटूंबावर आरोप केले होते. याप्रकरणी अजित पवारांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाच्या धाडी देखील पडल्या. या नंतर अजित पवारांनी सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना जरंडेश्वर कारखान्याची माहिती दिलीच परंतू सोबत इतर साखर कारखान्यांची माहिती देखील वाचून दाखवली. अजित पवार यांनी वाचून दाखवलेल्या माहितीमुळे इतर राजकारणी अडचणीत आलेत का? पहा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट...