राज्यातील तब्बल ५० आमदार सध्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये राहत आहेत. सत्ता नाट्यात आमदार व्यस्त आहेत तर राज्यातील जनतेचे प्रश्न मात्र अजूनही कायम आहेत. "बँकेकडं गेलं तर बँका कर्ज देत नाहीत आता तर आमदारही भेटत नाही आणि खासदारही भेटत नाही, ते त्यांची खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत, या शब्दात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत.