स्थानिकांनी गाळला घाम आणि परप्रांतीयाला दाम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. पण आता कोकणातही स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद निर्माण झाला आहे. धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...;

Update: 2022-08-08 15:17 GMT

उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये प्रसिद्ध असलेला रिव्हर राफ्टींग हा साहसी खेळ रायगडमधील तरुणांनी कुंडलिका नदीमध्ये सुमारे २० वर्षांपूर्वी सुरु केला होता . आज रायगड जिल्ह्यातील कुंडलीका नदी आणि कोलाड हे रिव्हर राफ्टींगसाठी प्रसिद्ध आहे . या रिव्हर राफ्टींगमुळे साजे , रवाळजे , पाटणुस , विळे , लवले वाडी , वांगणेवाडी , कुडली , सुतारवाडी , येरद आणि कामत या दुर्गम गावातील ग्रामस्थांना घरच्या घरी व्यवसाय निर्माण झाल्याने रोजगार मिळाला . मात्र , कोलाड येथील एका राफ्टींग कंपनीने राफ्टींगचा ठेका घेतल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक व परप्रांतीय असा संघर्ष सुरु आहे . स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे . स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी , पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता , तहसीलदार , प्रांत अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार

करून स्थानिकांना या नदीत व्यवसाय करण्यासाठी ठेका द्यावा , अशी मागणी वारंवार केली होती . हे . मात्र , याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीचा विचार न केल्याने हा व्यवसाय हा स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे . कुंडलिका नदीमध्ये रिव्हर राफ्टींग ( नौका नयन ) हा व्यवसाय गेले अनेक दिवसापासून एका कंपनी मार्फत चालविला जात होता . तेव्हा त्या कंपनीने तेथील स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून स्थानिक सुशिक्षित तरुणांना बरोबर घेऊन १० ते १५ स्थानिक लोकांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली होती . त्यातील काही प्रकल्पग्रस्त आहेत . त्यामुळे त्या कंपन्यापासून शेकडो स्थानिक प्रकल्पग्रस्त लोकांना रोजगार मिळत होता . त्यानंतर सन २०१ ९ -२० व २०२०-२१ या दोन्ही वर्षी नियम व अटी पाब्यावर बसून कोलाड कार्यकारी अभियंता यांनी मर्जीतील ठेकेदारास ठेका मिळावा म्हणून अधिकाराचा

गैरवापर करून स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना डावलण्यासाठी सर्व नियम , अटी व परवानग्या विचार न घेता स्वतःच्या मर्जीने ठेकेदारास ठेका दिला , असा आरोप स्थानिकांनी आ . भरत गोगावले यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे . त्यांनतरही सन २०२२-२३ सुधारित ठेका परत त्याच ठेकेदाराला देण्याचा घाट घातला असल्याचा आरोप केला आहे . या प्रकल्पात अनेक स्थानिकांच्या जमिनी गेल्या असून , त्या स्थानिक भूमीपुत्रांना तेथे राफ्टींग व्यवसाय करण्यासाठी ठेके मिळावेत , अशी मागणी स्थानिकांनी केली आहे .

कुंडलिका नदीतील राफ्टींग वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे मान्य करीत याबाबत स्थानिकांचे म्हणणे वरिष्ठांपुढे मांडले असून , वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय घेतला जाईल . संबंधित कंपनीने टेंडर पद्धतीने ठेका राफ्टिंग चा ठेका घेतला आहे, असे लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी ए.व्ही . चिमलगी यांनी सांगितले. तर या व्यवसायावरून वाद निर्माण झाला असून , आम्ही निर्माण केलेल्या व्यवसायातून आम्हालाच बाहेर काढले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर असून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे असे रवाळजे ग्रामपंचायत सरपंच नम्रता लाड म्हणाल्या.

Full View

Tags:    

Similar News

null