कपिल सिब्बल म्हणजे विजय माल्या बरखा दत्तचा हल्ला

Update: 2019-07-15 15:35 GMT

कपिल सिब्बल आणि त्यांची पत्नी यांनी सुरू केलेल्या तिरंगा टीव्हीचं शटर डाऊन झालं आहे. तिथल्या पत्रकार आणि कर्मचारी अशा 200 लोकांना सहा महिन्यांपासून पगारच आणि इतर देणीच सिब्बल यांनी दिलेली नाहीत. स्वतः दररोज कोट्यवधी रूपये कमवणाऱ्या सिब्बल आणि त्यांच्या पत्नीने पत्रकारांची देणी थकवली, वर महिला पत्रकारांना कुत्तीया असं ही म्हटलं असल्याचा आरोप बरखा दत्त यांनी एका ट्वीट द्वारे केला आहे.

कर्मचारी आणि पत्रकारांचा पगार थकवून कपिल सिब्बल आणि त्यांची पत्नी तोंड लपवत फिरत असल्याचं बरखा दत्त यांनी म्हटलंय. दोन वर्षे आपण कुठल्याही परिस्थितीत हे चॅनेल बंद करणार नाही, असं आश्वासन देऊन सिब्बल यांनी पत्रकारांना या चॅनेल मध्ये निमंत्रित केलं होतं. आता निवडणुका होताच मोदींवर खापर फोडून चॅनेल बंद करायचा बहाणा आहे. मात्र यात भारत सरकारचा काहीही संबंध नसून पगार थकवून सिब्बल परिवार लंडन मध्ये सुट्टी एन्जॉय करत होतं. एका अर्थी हे विजय माल्ल्या सारखंच आहे, असं बरखा यांचं म्हणणं आहे.

[gallery ids="45923,45924,45925,45926,45928,45929,45930,45931,45932,45933"]

सिब्बल यांच्या पत्नीचा मटणाचा कारखाना आहे. न्यूजरूम मध्ये त्या जोरजोरात ओरडून मी माझा कारखाना कामगारांना एक पैसा न देता बंद केला, माझ्याकडे पैसे मागणारे पत्रकार कोण लागतात, असं बोलून त्यांनी पत्रकारांचा अपमान केल्याचं दत्त यांचं म्हणणं आहे.

सिब्बल यांनी पत्रकारांची फसवणूक केली असा आरोप बरखा दत्त यांनी केलेला असतानाच या विषयावर सिब्बल यांनी काहीही प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. सिब्बल यांच्या टाइमलाइनवर शेवटचं ट्वीट पत्रकार अमित शर्मा यांना रेल्वे पोलीसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करणारं आहे. कायद्याचं रक्षण करणारेच कायद्याचं उल्लंघन करत असल्याची टीका माजी कायदामंत्री कपिल सिब्बल यांच्या ट्वीटरवर शेवटचं ट्वीट म्हणून दिसतेय..

https://twitter.com/KapilSibal/status/1138725090432937984

Similar News