वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे गुढीपाडव्याच्या सणावर महागाईचे सावट
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असताना शासनाने वाहनांच्या टोल वाढीचा निर्णय घेतला आहे. त्याचाही परिणाम गुढी पाडव्याच्या सणावर झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच साखरेच्या हाराच्या उद्योगावर झाला असल्याचे दिसत आहे. यामुळे येणाऱ्या काळात महागाई आणखीन वाढत जाणार असल्याचे चित्र सध्या तयार झाले आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट;
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर जाणवत आहे. भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याच्या सणाला विशेष असे महत्व आहे. याच दिवसापासून मराठी वर्ष सुरू होते. या दिवसाला शुभ मानून अनेकजण घर खरेदी करतात तर काहीजण सोने,चारचाकी वाहने खरेदी करतात. याच दिवशी काहीजण घराचे बांधकाम सुरू करतात. या सणामध्ये साखरेच्या हारालाही विशेष असे महत्त्व आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे या सणावर महागाईचे सावट पसरले आहे. या दिवशी अनेक जण घर बांधण्यासाठी भूमिपूजन करतात. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे घरबांधणीसाठी आवश्यक असणाऱ्या सिमेंट, स्टील,वाळू,खडी यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणापासून ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. तर चारचाकी,दोन चाकी वाहनांच्या किंमतीत ही वाढ झाली असल्याचे पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या किंमतीत ही वाढ होताना दिसत आहे. वाढत्या महागाईचा फटका गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांना सोसावा लागणार आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा परिणाम ट्रान्सपोर्ट व्यवसायावर झाला असल्याचे दिसते. त्यांच्या भाडेवाडीत वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या किंमतीत ही येणाऱ्या काळात वाढ होणार असल्याचे दिसते. वाहनांच्या वाढत्या भाडेवाडीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर पहायला मिळणार आहे. किराणा मालाची वाहतूक करणारी वाहने जास्त भाडे आकारू लागल्याने किराणा दुकानातील सर्वच वस्तूंच्या किंमतीत फरक पडला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. खाण्याच्या तेलाच्या किंमती तर गगनाला भिडल्या आहेत. त्यांचे भाव 180 रुपये किलो पर्यंत गेले आहेत. डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे गुढी पाडव्याच्या सणावर महागाईचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे.
साखरेच्या आणि गॅसच्या दरात वाढ झाल्याने साखरेच्या हाराच्या किंमतीत वाढ
गुढीपाडव्याच्या सणाला साखरेच्या हाराची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे साखरेचे हार बनवण्याची प्रक्रिया महिनाभर आधीच सुरू असते. यासाठी आवश्यक असणारा कामगार आणला जातो. हार बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य गोळा केले जाते. भट्टी पेटवली जाते. यासाठी विशिष्ट प्रकारचा साच्या बनवला जातो. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या आणि गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचा परिणाम हार बनवणाऱ्या उद्योगावर ही झाला असल्याचे दिसते. पूर्वी साखरेच्या किंमती कमी होत्या. त्यामुळे साखरेच्या हाराना बाजारात जास्त प्रमाणात मागणी होती. सध्या कामगारांच्या पगारातही वाढ झाली असल्याचे दिसते. हार तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच साहित्याच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली आहे. आधीच कोरोनांच्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून व्यापार बंद असल्याने साखरेचे हार तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसला होता. सध्या कोरोनाचे नियम स्थितील केले आहेत,परंतु बाजारात म्हणावे तेवढी साखरेच्या हाराना मागणी नाही. त्यात कडक उन्ह असल्याने ग्राहक घराच्या बाहेर यायला तयार नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने आपोआप वाहतुकीचा खर्च वाढला आहे. तयार झालेल्या साखरेच्या हारांची डिलिव्हरी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल जाते. त्यामुळे साखरेचे हार तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांना साखरेच्या हारांच्या किंमतीत वाढ करावी लागली आहे. साखरेच्या हारांच्या किंमती वाढल्याने जास्त प्रमाणात ग्राहक बाजारात हार खरेदीसाठी येईना गेले आहेत. त्याचा परिणाम साखरेचे हार बनवणाऱ्या उद्योगावर झाला आहे.
कोरोनांच्या निर्बंधामुळे हाराच्या व्यापारावर परिणाम
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने नागरिकाना निर्बंध घालून दिले होते. 31 मार्च रोजी शासनाने लावलेले निर्बंध पूर्णपणे हटवण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जनतेत उत्साहाचे वातावरण आहे. पण नाराजीचा सूर ही ऐकायला मिळत आहे. विशेष करून व्यापारी वर्गात याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शासनाने गेल्या 15 दिवसांपूर्वी कोरोनाच्या संदर्भातील निर्बंध स्थितील केले असते तर लोकांची बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसली असती. व्यापाराची चांगली उलाढाल झाली असती,असे अनेक व्यापाऱ्यांना वाटते. ऐन गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला कोरोनांचे निर्बंध स्थितील केल्याने त्याचा म्हणावा तितकासा फायदा व्यापाराला होणार नाही,असे अनेक व्यापाऱ्यांना वाटत आहे. कोरोनांच्या नियमाचा जसा उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे,तसाच परिणाम साखरेचे हार बनवणाऱ्या उद्योगावर झाला आहे. या साखरेच्या हारांची मागणी घटली आहे. कोरोनांच्या निर्बंधामुळे लोकांच्या मनात निर्बंध हटतील की नाही याबाबत साशंकता होती. पण प्रशासनाने सगळेच निर्बंध हटवून उत्साहात सण साजरा करण्याची परवानगी दिली आहे.
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बरोबरच वाहनाच्या टोल दरात वाढ
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असताना शासनाने वाहनांच्या टोल वाढीचा निर्णय घेतला आहे. त्याचाही परिणाम गुढी पाडव्याच्या सणावर झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच साखरेच्या हाराच्या उद्योगावर झाला असल्याचे दिसत आहे. यामुळे येणाऱ्या काळात महागाई आणखीन वाढत जाणार असल्याचे चित्र सध्या तयार झाले आहे. त्यामुळे ग्राहक वस्तू खरेदी करताना अगदी बारीक विचार करून खरेदी करू लागले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम उद्योगधंद्यावर होणार आहे. वाहनांच्या टोल दरात वाढ झाल्याने येणाऱ्या काळात आणखीन महागाई वाढणार आहे. त्याचे चटके सर्वसामान्य जनतेला बसणार आहेत. त्याची सुरुवात गुढी पाडव्यापासून सुरू होणार आहे.
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असताना शासनाने वाहनांच्या टोल वाढीचा निर्णय घेतला आहे. त्याचाही परिणाम गुढी पाडव्याच्या सणावर झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच साखरेच्या हाराच्या उद्योगावर झाला असल्याचे दिसत आहे. यामुळे येणाऱ्या काळात महागाई आणखीन वाढत जाणार असल्याचे चित्र सध्या तयार झाले आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट
यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यापारी वसंत सनगर म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे व्यापार बंद होता. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने या धंद्यात मंदी येऊन साखरेच्या हारांची मागणी घटली. गेल्या वर्षी हारांचे नुकसान झाल्याने हारांचे उत्पादन कमीच केले आहे. यावर्षी 9 हजार रुपये क्विंटलने माल विकला गेला आहे. कोरोनाच्या आधी साखरेच्या हाराला 5 ते 6 हजार रुपये क्विंटल भाव होता. त्यात आता वाढ झाली आहे. त्यावेळेस साखरेच्या किंमतीही कमी होत्या. त्यामुळे हारांच्या किंमती कमी होत्या. पण आता हार बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्वच घटकाच्या किंमतीत वाढ झाली आहे. हार बनवणाऱ्या कामगारांचे पगार वाढले आहेत. पूर्वी 250 ते 300 रुपयांत काम करणारे कामगार आता 500 रुपये हजेरी घेऊ लागले आहेत. पूर्वी कामगार कामावर लवकर यायचे पण आता येत नाहीत. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे व्यापाऱ्यांनाही हा धंदा परवडेना गेला आहे. वाढत्या तेलांच्या किंमतीमुळे या धंद्यावर 40 ते 50 टक्के परिणाम झाला आहे. पूर्वी 90 टक्के ग्राहक हाराचा माल घेऊन जात होते. पण आता 40 ते 50 टक्केच लोक हार घेऊन जातात व गुढीपाडवा साजरा करतात. जाग्यावरच हारांच्या किंमती वाढल्याने बाजारात हार 110 ते 150 रुपये किलोच्या किंमतीने विकले जात आहेत