१०० कोटी भारतीय लसीकरणाचे ढोल जगभर वाजवले जात असताना आंतराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज जॉन हॉपकीन्स संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीत भारताच्या लसीकरणाच्या आणि टक्केवारीच्या आकडेवारीचा भांडाफोड करणार अहवाल प्रसिध्द केला आहे.
जॉन हॉपकीन्सच्या ताज्या आकडेवारीत भारतामधे 986,196,775 इतके कोविड डोसेस देण्यात आले आहेत. एकुण लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 280,808,336 इतकी असून दोन्ही डोस घेऊन पुर्ण लसीकरण झालेल्या देशाच्या लोकसंख्येची टक्केवारी 20.55% इतकी आहे.
जगाची तुलना जागतिक सरासरीच्या तुलनेत अधिक लसीकरण असलेल्या देशामधे ८९ देशांचा समावएश आहे. त्यानंतर जागतिक सरासरीपेक्षा कमी असलेल्या लसीकरणामधे भारताचा क्रमांक लागतो, या जागतिक लसीकरणाच्या यादीत देशाच्या एकुण लसीकरण टक्केवारीमधे १०४ क्रमांकावर भारत आहे.
लोकसंख्येनुसार दोन्ही डोसचे लसीकरण झाल्यामधे चीन पहील्या क्रमाकांवर आहे. चीनमधे आजअखेर 1,047,872,000 नागरीकांनी संपूर्ण लसीकरण पूर्ण केलं आहे. त्यापाठोपाठ भारताच क्रमांक लागतो जॉन हॉपकीन्स संस्थेच्या आकडेवारीनुसार भारताने 280,808,336 इतक्या लोकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.
वरीष्ठ पत्रकार राजदिप सरदेसाई यांनी याबाबत एक ट्विट केलं असून यामधे जगाच्या आकडेवारीबरोबरच जॉन हॉपकीन्स संस्थेचा अहवाल जोडला आहे.
आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधे दुसऱ्या क्रमांकावरील देश असून फक्त २१ टक्के लोकापर्यंत कोविडच्या दोन्ही लसी देऊ शकलो आहे, याबाबत भाष्य केलं आहे.
आकडेवारी जॉन हॉपकीन्स संस्थेच्या वेबसाईटवरुन https://coronavirus.jhu.edu/vaccines/us-स्टेट्स