पावसाळा सुरु झाल्यावर आरोग्याच्या समस्या देखील सुरु होतात. साथीचे रोग वाढण्यास सुरु होतात. गेल्या चार महिन्यांतील या रुग्णांची संख्या २२,८७० इतकी झाली असून यामुळे आरोग्य विभाग चांगलेच भांबावले आहे. यामध्ये डेंग्यूचे रुग्ण ८९० इतके झाले आहेत.
या साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठी आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. रेल्वेतून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात आणि त्यांमुळेच असे संसर्गजन्य रोग पसरतात असे आरोग्यविभागाचे म्हणणे आहे. तसेच सर्दी, खोकला, घसा खवखवने, ताप, उलटी सारखी काही लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणा करुन इलाज करण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाने केले आहे.