मंत्रालयात मारहाण झालेला शेतकरी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत

मी जिवंत असेपर्यंत फडणवीसांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू देणार नाही : मंत्रालयात मारहाण झालेला शेतकरी रामेश्वर भुसारेची मॅक्स महाराष्ट्रवर खळबळजनक मुलाखत

Update: 2021-03-24 15:30 GMT

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता अन्याय अत्याराचारवर बोलतात. पण, ते मुख्यमंत्री असताना २३ मार्च २०१७ रोजी मला मंत्रालयात गुऱ्हासारखी मारहाण केली. खोटं बोलले. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मी आता शपथ घेतली आहे,`` भलं कर्जबाजारी होईल, पण मी जिवंत असेपर्यंत फडणवीसाला परत मुख्यमंत्री होऊ देणार नाही. हा संदेश घेऊन मी महाराष्ट्रभर फिरेल,`` असं घाटशेंद्रा, ता. कन्नड. जि. औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारेंनी मॅक्स महाराष्ट्रला सांगितलं.

रामेश्वर हरिभाऊ भुसारे या अल्पभुधारक शेतकऱ्यांने आपल्या एक एकर शेतात जानेवारी 2015 मध्ये शेडनेट बसवण्यासाठी स्वताजवळेचे आणि मित्रांकडून 10 लाख रूपये खर्च केले. त्या रोपवाटीकेसाठी नियोजनही केले. रोपवाटिकेचे कार्डही छापले. त्यानंतर चांगले उत्पादन घेवून आपल्या पदरात चार पैसे पडतील या आशेवर असणाऱ्या भुसारे यांनी शेडनेटमध्ये पीक घेण्यास सुरवात केली.

परंतु 11 एप्रिल 2015 व 14 एप्रिल 2015 रोजी आलेल्या वादळी वारे व गारपीठीने त्यांचे शेडनेट पिकासहित जमीनदोस्त झाले.आस्मानी संकटाने पुरते हादरलेल्या रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून कन्नड तहसीलदार व औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केले. त्यानंतर कन्नड तहसीलदारांच्या आदेशाने त्यांच्यासह गावातील इतरांच्या नुकसानीचे पंचनामेही कृषीविभागाकडून करण्यात आले.

परंतु वर्ष उलटून गेले तरिही कोणतीही कार्यवाही होत नव्हती. मंत्र्यांना आपल्या समस्या कळावी म्हणून भूसारे हे गावापासून 35 किलोमीटर कन्नडला येवून मेल करायचे. सगळ्या मंत्र्यांनी त्यांनी मेल केले. जिल्हा अधिकारी, तहसीलदार कृषी अधिकारी यांच्या सरकारी कार्यालयाच्या चकरा मारून थकलेल्या भुसारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली.

4 आॅक्टोबर 2016 रोजी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकी दिवसी आपल्याला न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर चारवेळा मंत्रालयात चकरा मारल्यावर त्यांना जुन्या नियमाने तुला नुकसान भरपाई देता येणार नाही. तू नविन शेडनेट उभार त्यासाठी आम्ही बँकेला कर्ज द्यायला लावतो असे सांगण्यात आले.

Full View


त्यानंतर रितसर बँकेत अर्ज, जामीन हे सोपस्कर पार पाडले. त्यानंतर बँकेने भुसारे यांना 16 लाख 22 हजार 967 प्रकल्प खर्चापैकी 12लाख 17 हजार 225 इतके बँक लोन, तर 4 लाख 5 हजार 742 इतके म्हणजे 25 टक्के रक्कम भरण्यास सांगितले.

आम्ही त्यांना भेटायला आलो तेव्हा त्यांचे घर बघून तर मी तर हदरलोच. पत्र्याच्या शेडमध्ये हा बळीराजा राहतोय. ते ही महिना पाचशे रूपये भाड्याने, त्याचे मुळे घर शेतात होते, तेही वादळीवाऱ्यात होत्याचे नव्हते झाले. चार एकर जमिन त्यात केवळ एकरभर भिजेल ऐवढचं पाणी, म्हणजे बागायती क्षेत्र केवळ एक एकर ( खाली सगळे फोटो टाकतोय पहा ) तो येवढे पैसे कुठून आणणार ?

आपल्याला मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षापासून पाठ पुरावा करतोय. पण आपली दखलच घेतली जात नाही. म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर भुसारे यांनी आझाद मैदानात उपोषणही केले. मात्र, शासन व्यवस्थेला जाग येत नसल्याने यावर कायतर मार्ग काढावा यासाठी रामेश्वर भुसारे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते.

मात्र, त्याला जरब मारहाण करून त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. "बळी"राजा रामेश्वर भुसारे यांनी एक लहान मुलगी एक मुलगा आहे. पत्नी व रामेश्वर भुसारे रोजंदारीने कामाला जातात. चार एकर शेती तीही पडीक, केवळ एक एकर भिजेल इतकेच पाणी. त्यामुळे त्यांनी शेडनेट उभारले होते. पावसाने होत्याचे नव्हेत केले.

आता ज्याला चुल पेटवायची भ्रांत. म्हणून शासनाकडे मदत मागणाऱ्या रामेश्वर भूसारे यांचे काय चुकले ? रामेश्वर भुसारे यांचा जगण्याचा हट्टाहास हाच त्यांचा गुन्हा होता काय ? गळ्याला फास घेवून जिवन संपवण्यापेक्षा संघर्ष करायचा आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांकडे, "साथ द्या" ही मागणे करणे गुन्हा आहे काय ?तीन वर्षानंतरही रामेश्वर भुसारे न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

Tags:    

Similar News