गडचिरोलीत मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; पोराला वाघाने मारलं, लाखोंचा मोबदला काय कामाचा?
७५ टक्के जंगलाने व्यापलेला गडचिरोली जिल्ह्याची ओळख तशी मागास आणि नक्षलग्रस्त अशीच. परंतु मधल्या काळात स्थलांतरित वाघांमुळे येथे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला. त्यामागे नेमके काय कारण आहे ? यामुळे येथील मानव जीवनावर काय परिणाम झाला ? प्रशासनाची आणि राजकीय नेत्यांची यात भूमिका काय ? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा करणारा सुमित पाकलवार यांचा हा 'रिपोर्ताज' नक्की वाचा…
दुपारची वेळ गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १६ किलोमिटर अंतरावर असलेल्या पोर्ला या गावी रस्त्याच्या कडेला एक छोटंसं घर होतं. घरात सत्तरीच्या आसपास असलेली एक वृध्द महिला एकटीच पाणावलेल्या डोळ्यांनी भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे एकटक बघत होती. ते घर होतं किशोर मामीडवार या तरुणाचे. किशोर आज आपल्यात नाही. आठ महिन्यांपूर्वी घराच्या मागे जंगलात रानभाजी आणायला गेलेल्या किशोरला वाघाने ठार केले. अविवाहित असलेला किशोर अवघ्या ३० वर्षांचा होता. किशोरची आई सुशीला मामीडवार आजही किशोरच्या आठवणींनी गहिवरून जातात. म्हातारपणाचा आधार असलेला माझा एकुलता एक पोरगा गेला, आता सरकारकडून मिळणाऱ्या पैशाचं मी काय करू ? असा प्रश्न त्यांनी केला आणि सारेच निशब्द झाले. गेल्या पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्यावर आलेल्या व्याघ्र संकटामुळे आज कित्येक सुशीला निराधार झाल्या आहेत. ७५ टक्के जंगलाने व्यापलेला गडचिरोली जिल्ह्याची ओळख तशी मागास आणि नक्षलग्रस्त अशीच. परंतु मधल्या काळात स्थलांतरित वाघांमुळे येथे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला. त्यामागे नेमके काय कारण आहे ? यामुळे येथील मानव जीवनावर काय परिणाम झाला ? प्रशासनाची आणि राजकीय नेत्यांची यात भूमिका काय ? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या 'रिपोर्ताज'मध्ये करण्याचा प्रयत्न.
मानव- वन्यजीव संघर्षाची सद्यस्थिती
१९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. येथील ७५ टक्क्यांहून अधिक भूभाग जंगलानी वेढलेला. निर्मितीपासूनच नक्षलवादाचे शाप या जिल्ह्याला आहे. साधारण ८० च्या दशकातच नक्षलवादाने जिल्ह्यात पाय पसरायला सुरवात केली. आजही त्याची झळ येथील आदिवासी सोसतोय. मात्र, या दरम्यान येथे कधीच मानव-वन्यजीव संघर्ष पाहायला मिळाला नाही. एखाद-दोन अस्वलाचे हल्ले वगळता कुणाला वन्यप्राण्याने ठार केले, अशी बातमी कानावर येणे दुर्मिळच. पण गेल्या पाच वर्षात असा एक दिवस जात नाही. ज्यात वाघाच्या हल्याची बातमी कानावर पडणार नाही. विशेष करून उत्तर गडचिरोली हा परिसर यामुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. या भागात दिवसाढवळ्या रस्त्याच्या कडेला वाघ दिसणे सामान्य झाले आहे. मागील आठवड्यात तर एक वाघीण चक्क गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या रोपवाटिकेत शिरली होती.
वाघाच्या दहशतीमुळे येथील नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. शेती आणि वनउपज यातून मिळणारे उत्पन्न घटले. ३० टक्के शेती ओसाड पडली.
गडचिरोली आणि देसाईगंज (वडसा) वनविभाग वाघांच्या हल्ल्यामुळे होरपळून निघतोय. मागील चार वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील ४६ नागरिकांना वाघांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. तर ८ नागरिकांचा मृत्यू बिबट, अस्वल आणि रानटी हत्तींच्या हल्ल्यात झाला.
यात देसाईगंज वनविभागात ३५ तर गडचिरोली वनविभागातील ११ व्यक्तींचा समावेश आहे. तर उर्वरित सिरोंचा, भामरागड आणि आलापल्ली वन विभागातील आहेत. जिल्ह्यातील प्रभावित तालुक्यांचा विचार केल्यास देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली आणि धानोरा हे सर्वाधिक प्रभावित तालुके आहेत. यातील पिडीत कुटुंबांना आजपर्यंत ५.३० कोटी रुपये मोबदला म्हणून देण्यात आले आहे. परंतु या सगळ्या संघर्षात येथील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, गुराखी सर्वाधिक भरडल्या गेले. वनविभाग उपाययोजना करताना दिसून येतात. पण ते फार उपयोगी ठरत नाही. अपुरे आणि अप्रशिक्षित मनुष्यबळ याला कारणीभूत आहे. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात जीव गेलेल्यांना शासनाकडून घोषित मोबदला देणे आणि यासाठी लागणारे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करणे एवढ्यासाठीच वनविभाग कार्यरत आहे काय असा प्रश्न पडतो.
गडचिरोलीत वाघांची पार्श्वभूमी
गेल्या पाच दशकांपासून घनदाट जंगल असूनही गडचिरोली जिल्ह्यात वाघाचे अस्तित्व नगण्य होते. २०१६ मध्ये देसाईगंज तालुक्यात रविना नावाची वाघीण आढळून आली होती. त्यांनतर ही संख्या वाढून आज ५० च्यावर पोहोचली आहे. १९७२ साली भारत सरकारने कायदा करून वन्यजीवांच्या शिकारीवर बंदी आणली. मात्र, त्यापूर्वी पोर्ला हे वाघांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध होते. येथील मीर युसुफ अली हे नवाब विदेशी पर्यटकांसाठी वाघाच्या शिकारीचे आयोजन करायचे. त्यामुळे या भागात वाघाचे अस्तित्व होते. हे सिद्ध होते. परंतु कालांतराने येथील वाघ संपले. १९८२ नंतर या परिसरात वाघाच्या हल्ल्याबाबत उल्लेख आढळत नाही. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढू लागली आणि या प्रकल्पाची सीमा गडचिरोलीच्या देसाईगंज, आरमोरी तालुक्याला लागून असल्याने तेथील वाघांचे स्थलांतर हळू हळू सुरू झाले. मोठ्या प्रमाणात जंगल आणि पाण्याचे साठे यामुळे या स्थलांतरित वाघांनी गडचिरोलीच्या जंगलात आपले बस्तान मांडले. दरम्यानच्या काळात सीटी १ नावाच्या वाघाने देसाईगंज वन विभागात अक्षरशः उच्छाद मांडला होता. त्याने १४ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेतला. त्याला पाच महिन्यांपूर्वी जेरबंद करण्यात आले. आता गडचिरोली वन परिक्षेत्रातील जी ५ या वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू आहे. तिने देखील १३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे.
आजघडीला गडचिरोली वनविभागात २१ आणि देसाईगंज २१, आलापल्ली ५ आणि सिरोंचा वन विभागात ३ असे एकूण ५० वाघांची नोंद आहे. पण अभ्यासकांशी आणि प्रभावित क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा केल्यास ही संख्या शंभरच्या आसपास असण्याची शक्यता आहे. २० मार्च रोजी भरदिवसा गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या रोपवाटिकेत वाघीण शिरल्याने तारांबळ उडाली होती. त्या वाघिणीचे वनविभागच्या दफ्तरी नोंद नव्हती. असे नोंद नसलेले अनेक वाघ गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात आहे. दक्षिण गडचिरोलीतील अहेरी, भामरागड तालुक्यातील मधल्या काळात वाघाच्या शिकारीचे प्रकरण पुढे आले होते. त्यांनतर असे प्रकार निदर्शनास आले नाही. त्याभागात वाघाचे अस्तित्वही नगण्य आहे. वन विभागाच्या क्षेत्रानुसार नजर टाकल्यास गडचिरोली, चातगाव, पोर्ला, आरमोरी आणि देसाईगंज हे सर्वधीक धोकादायक वनपरिक्षेत्र आहेत.
हल्ले का वाढले..?
जिल्ह्यात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. त्यामुळे पावसाळ्यात शेतकरी सर्वाधिक व्यस्त असतात. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात देसाईगंज वनपरिक्षेत्रातील कोंढाळा गावातील रहिवासी गवळीदास गुरनुले वय ५० वर्षे हे गावालगत असलेल्या आपल्या शेतात सायकलने जात होते. दरम्यान, वाटेत त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे न घाबरता गुरूनुले यांनी सायकलच्या साहाय्याने वाघाचा मुकाबला केला. जवळपास १० मिनिटे चाललेल्या झटापटीत ते जखमी झाले. पण हिम्मत सोडली नाही. अखेर वाघ तेथून निघून गेला आणि गवळीदास यांचे प्राण वाचले. हा प्रसंग वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या प्रत्येकाच्या वाटेला आला आहे. सर्व घटनांनावर बारकाईने लक्ष दिल्यास वाघाने गावात येऊन हल्ला केल्याचे कुठेही आढळत नाही. शेतात काम करणारे मजूर, जनावरांना चरायला जंगलात नेलेला गुराखी, रानभाजी, सरपण आणि मोहफुल किंवा वनउपज गोळा करायला गेलेले गावकरी वाघाच्या भक्ष्यस्थानी पडले. जिल्ह्यात मागील दहा वर्षात ४० हजार हेक्टरवर वनपट्टे वाटप करण्यात आले. हे सर्व अतिक्रमण जंगलातील आहे. त्यामुळे शेतकामासाठी देखील जंगलातच जावे लागते. अशात गावकऱ्यांचा वाघासोबत सामना होतो. त्यामुळे हे हल्ले वाढले असल्याचे तज्ञ सांगतात.
वनविभागाची भूमिका काय..?
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी हा प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे त्या भागात अशाप्रकारच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी शीघ्र कृती दल, प्रशिक्षित वनरक्षक 'मॉनिटरिंग'साठी विशेष तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज असे विशेष पथक आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात अशाप्रकारची कोणतीही सुविधा नाही. त्यात वनपाल, वनरक्षकांची २०३ पदे आणि ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अशात उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे वनविभागाला काम करावे लागत आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील भागात 'ट्रॅप कॅमेरे' बसवून वाघांवर लक्ष ठेवण्यात येते. सोबतच वनविभागाचे कर्मचारी त्या भागात जाऊन नागरिकांना वेळोवेळी सूचना देत असतात. वाघाचा वावर असलेल्या परिसरात वनकर्मचारी तैनात करण्यात येतात. पण अनेकदा सूचना केल्यावरही काही लोकं जंगलात जातात आणि वाघाचे बळी ठरतात असे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी सांगितले.
वन्यजीव अभ्यासक काय सांगतात ?
गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे याविषयी सांगतात की, २०१६ मध्ये आरमोरी तालुक्यातील रवी या गाव परिसरात रवीना नावाची वाघीण वनविभागाने जेरबंद केली तेव्हाच भविष्यात मानव - वन्यजीव संघर्ष वाढत जाईल, याचे संकेत मिळाले होते. तेव्हापासून अशा समस्या निवरण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करणे गरजेचे होते. अजूनही गडचिरोली जिल्ह्यासाठी असे समस्याग्रस्त वन्यजीव पकडायला सुसज्ज बचाव पथक नाही. म्हणून तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी, नेमबाज, अनुभवी कर्मचारी असलेले शिघ्र बचाव पथक (रॅपिड रेस्क्यू युनिट) गरजेचे आहे. सोबतच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर तातडीने उभारायला हवे. शहरात जंगलसदृश्य असलेल्या परिसरातील काटेरी झुडपे, झाडोरा नष्ट करून तिथं चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते हवेत. शिवाय जनजागृती अत्यावश्यक आहे. मानव - वन्यजीव संघर्ष नीट अभ्यासून उपाययोजना सुचविण्यासाठी एक मोठा संशोधन प्रकल्पही हाती घ्यायला हवा. पण असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात बळी पडणाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
तर तब्बल ५३ वाघांना जेरबंद करणारे वन्यजीव पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत खोब्रागडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र बळी हे बेसावध असल्याने वाढत आहे असे सांगितले. सोबतच नरभक्षक वैगरे वाघ नसतो हे स्पष्ट करताना येथील लोक जंगलात जातात आणि बळी पडतात, वाघ गावात येऊन माणसांची शिकार करीत नाही हेही
नमूद केले.
नागरिक काय म्हणतात..?
मागील पाच वर्षात सामान्य नागरिकांवर वाढलेले वाघांचे हल्ले आणि यातून गेलेले जीव यामुळे परिसरात कायम दहशतीचे वातावरण असते. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शेती ही जंगलाला लागून आहे. त्यामुळे कितीही अडवलं तरी पोट भरण्यासाठी गावकऱ्यांना शेतात जावेच लागते. तर अनेकांची रोजीरोटी जंगलातील वनउपजावर अवलंबून आहे. त्यामुळे ते गोळा करू बाजारात विकल्याशिवाय घर कसे चालवायचे हा देखील प्रश्न त्यासमोर आहे. एकंदरीत बघितल्यास 'इकडे आड तिकडे विहीर' अशा परिस्थितीत येथील नागरिक अडकले आहेत. त्यामुळे येथील वाघांना पकडून इतरत्र हलवा, एवढीच मागणी ते करतात. तर लोकप्रतिनिधी निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन यावर भाष्य करतात. पण पुढाकार घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यास ते देखील उत्सुक नाही. दुसरीकडे एक वाघीण एकावेळेस चार पिलांना जन्म देत असल्याने वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतातर मानवी वस्तीत वाघ येऊ लागला आहे. त्यामुळे शासनाने केवळ मोबदल्यावर अवलंबून न राहता कायमस्वरूपी धोरण ठरवावे हाच एक पर्याय शिल्लक आहे. अन्यथा येत्या काळात हा संघर्ष शिगेला पोहोचून नागरिक कायदा हातात घेतील अशी परिस्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही.
जंगल भागात झालेत ...वाघाच्या क्षेत्रात घटना घडल्या, शेतात जायचे असेल तर पहाटे आणि संधयकलच्या सुमारास वाघाचे शिकारीची वेळ असते. त्यामुळे या काळात आपण बसुंन काम करत असताना वाघाचे हल्ले होतात. उभे असतात सर्वाधिक केसेस गुराखी एका प्रकरणात गुराल पण मारले आणि गुरख्याला मारला.वाघाला अडविण्याचा प्रयत्न केला.
ग्रुपमध्ये जाणे योग्य राहील. मोह, रानभाज्या, मश्रुम , शेतात वाघ गावात येत नाही. सर्व जंगलात घडले . वारंवार सूचना देऊनही लोक जंगलात जातात. अमिर्झा ल जंगल भाग कमी आहे.तरीही वाघाच्या क्षेत्रातील लोकांना नोटीस देतात. काही दिवसांपूर्वी जो गुराखी मेला त्याला वन विभागाने नोटीसही दिली होती. तरीही तो गला.
- टायगर मॉनिटरिंग टीम यावर लक्ष ठेऊन आहे कॅमेरा ट्रॅप मधून ते लक्ष ठेऊन असतात.
- शरीरावर पट्टे यावरून ओळख करतात.
- काही टायगर सारखे प्रवास करता आहेत. तर काही त्याच भागात फिरतात.
- मॉनिटरिंग टीम, आणि त्यांच्याकडून येणारी रिपोर्ट ठेवत असतो.
- गुराखी आणि शेतकरी आणि लाकडे गोळा करण्यासाठी.
- शामाप्रसाद योजनेतून वन आणि गावं विकासासाठी तरतूद. पाणी आणि जेवण बनविण्यासाठी कमी लाकडात बॉम्ब
- गुरक्यांसाठी संरस्खित एरिया ठरविणे गरजेचे.
- १ वर्ष आईसोबत त्यांनतर वेगळे होऊन शिकार करतात.
Death २० L
पशुधन: बाजारभावाच्या ७५ टक्के
Gadchiroli division: १३
जंगलावर अतिक्रमण,पश्चिम महाराष्ट्रात शेतातून जाणारे रस्ते आहेत. मात्र इकडे नाहीत. त्यामुळे वाघांशी सामना होतो. याबरोबरच जास्तीत जास्त रस्ते हे जंगलातून जातात. गुराखी जंगलात गुरं राखायला जातात. तसेच १९७२ कायदा आल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढला. कारण त्यापुर्वी १९८० पर्यंत नवाब शिकारीला यायचे. त्यामुळे १९८० पर्यंत जास्त वाघ नव्हते. मात्र त्यानंतर वाघांची संख्या वाढली. सध्या ३५ हजार हेक्टर दावे आहेत. अजूनही अतिक्रमण आहे. ताडोबात वाघांची संख्या वाढली की ते इकडे येतात. तसेच पावसाळ्यात जंगल घनदाट होते. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढतो. यासोबत प्रशासकीय बाब म्हणजे २१० गार्ड आणि ५ अधिकारी पदं खाली आहेत.
आठवड्यात कोंढाळा येथील शेतकरी गवळीदास गुरनुले शेतावरून परततांना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला होता. पण त्यांनी न घाबरता जवळील सायकलचा आधार घेत बघासोबत दोन हात केले आणि आपला जीव वाचवला. यात ते गंभीर जखमी झाले. आज त्यांना प्रत्यक्ष भेटून सगळा थरार त्यांच्या तोंडून एकतांना अंगावर काटा उभा राहिला. हा परिसर सध्या प्रचंड दहशतीत असून वाघाच्या भीतीने 30 टक्के शेती यंदा पडीत आहे, अशी माहिती सुशीला मामिडवार या आजीने दिली.
वाघाची नावे कसे पडतात?
- भौगोलिक क्षेत्रानुसार नावे ठेवण्यात येतात.
- जसे गडचिरोली आहे तर G 10
- अशा प्रकारे नामकरण करण्यात येतात.