#MaxMaharashtra Impact: दृष्टीहीन विद्यार्थ्यांना अखेर लेखनिक मिळणार...
कोरोनाचं संकट डोक्यावर असताना राज्य सरकारने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर 10 वीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.
मात्र, यंदा परीक्षेत दृष्टीहीन मुलांनी परीक्षा कशा द्यायच्या? असा सवाल उपस्थित झाला होता. कारण 12 वी ची परीक्षा देत असताना 11 वीचे विद्यार्थी लेखनिक म्हणून मदत करत असतात. तसा निकषही आहे. परंतू यंदा Covid-19 च्या पार्श्वभूमीवर इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचं गणित बिघडलं आहे. त्यामुळं दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्यासमोर लेखनिक कुठून आणायचे? असा सवाल उपस्थित झाला होता.
या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने 18 फेब्रुवारीला 'लेखनिक नसल्यानं दृष्टीहीन 12 वीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात..' हा स्पेशल रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.
त्यानंतर सरकारने आता मॅक्समहाराष्ट्राच्या वृत्ताची दखल घेत दृष्टीहीन मुलांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याचे कनिष्ठ, महाविद्यालयाला दिले होते.
या संदर्भात शासनाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणे यांच्यामार्फत इच्छूक लेखनिक आणि वाचकांची बॅंक तयार करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी एक लिंक तयार केली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक अर्ज मिळेल. त्या अर्जावर पुढील माहिती देण्यात आली आहे.
विशेष गरजा असणा-या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी लेखनिक व वाचकाची आवश्यकता असते. या विद्यार्थ्यांना लेखनिक व वाचक म्हणून शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि वयाने प्रौढ असलेले सामान्य नागरिक सहाय्य करू शकतात. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग इच्छुक लेखनिक व वाचकांची बॅंक तयार करत आहे. यासाठी इच्छुकांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही. आपण स्वच्छेने यात सहभागी होत असल्यास खालील फॉर्म भरावा.
https://www.research.net/r/readerwriterbank
असं राज्य शैक्षणिक मंडळाने म्हटलं आहे.