दिव्यांग खेळाडूंची मैदानी खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप, काय आहेत अपेक्षा?
अमरावती मोबाईल, संगणक या तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगात युवा पिढी मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करत असल्याचे जाणवते. मात्र आलेल्या अंधत्वावर मात करून 'The Blind Welfare Association' द्वारा संचालित 'अश्रित अंध कर्मशाळा अमरावती' येथील विद्यार्थी याच मैदानी खेळात पारंगत झाले आहेत.
गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक यासारख्या मैदानी खेळात येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना हे खेळ कशा पद्धतीने शिकवले जातात?
या खेळाची प्रक्रिया नेमकी कशी असते? या खेळामध्ये दिव्यांगांच्या दृष्टीने शासनाने कोणत्या सर्वंकष योजना तयार केल्या पाहिजे? यासंदर्भात या विद्यार्थी आणि अधिकार्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी....