देशात सध्या बेरोजगारीचे संकट गंभीर झाले आहे. लाखो तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. पण अमरावतीमध्ये अंध विद्यार्थी स्वयंरोजगारातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. हे विद्यार्थी आपल्या अंधत्वावर मात करत स्पर्श ज्ञानाच्या साह्याने टॉवेल, सतरंज्या, आसनपट्टी अशा वस्तू तयार करत आहेत. हेच कौशल्य या विद्यार्थ्यांच्या रोजगाराचं सशक्त माध्यम ठरत आहे. ही प्रक्रिया नेमकी कशी असते, हे विद्यार्थी कशा पद्धतीने वस्तू बनवतात याची माहिती देणारा गौरव मालक यांचा स्पेशल रिपोर्ट....