दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण, खान्देशात तीन बालकांचा मृत्यू ....

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मूलांचं कोरोना बाधित होण्याचं प्रमाण अधिक. काय आहेत कारण? लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? वाचा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट;

Update: 2021-05-04 12:20 GMT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांचं कोरोना बाधित होण्याचं प्रमाण अधिक आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत राज्यात लहान मुलांना कोरोना लागण होण्याचं प्रमाण इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. एकट्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर मार्च ते एप्रिल या एका महिन्याच्या दरम्यान 70 मुलांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यात तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

16 बालके ICU मध्ये...

कोरोना ची दूसरी लाट ही, वृद्ध तरुण या पर्यंतसीमित न राहता आता जन्माला येणारी निरागस बालक ते इतर मुलांनाही देखील कोरोना च्या विळख्यात सापडली आहेत. जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर I. C. U मध्ये आज 16 चिमुकले श्वास घेत आहेत. जन्माला आल्या नंतर ज्या बाळांना आपल्या आईला कुशीत झोपायचं असतं. ती निरागस छोटी चिमुकली बाळ आज कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानं आज I. C. U त श्वास घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिशू केअर ICU मध्ये 16 बालकांवर उपचार सुरू आहेत. यातील बऱ्याचश्या बालकांची प्रकृतीत सुधारणा होत आहे .

गरोदर माता ते जन्माला आलेल्या बाळबाधित होण्याची शक्यता -

गरोदर असलेल्या महिला कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास बाळालाही बाधा होण्याची श्यक्यता सर्वाधिक असते. त्यामुळं जन्म झाल्यानंतर काही बालकांचे टेस्ट करण्यात येतात. त्यानंतर बालक बाधित झाल्यास त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतात. मात्र, यात बहुतांश बालकांची प्रकृती सुधारताच आई जवळ देण्यात येतात. लहान बालकांना कोविडसाठी विशेष असे उपचार नाहीत. रेग्युलर जे उपचार सूचनेनुसार आवश्यक आहेत ते देण्यात येतात. असं वैद्यकीय अधिकारी डॉ वृषाली सरोदे सांगतात.

कोरोना च्या या महामारीत बऱ्याच गर्भवती महिला देखील पॉझिटिव्ह झाल्याचं आढळून आलं आणि अश्यातच कोरोना पॉझिटिव्ह महिलेची डीलेव्हरी झाल्यानंतर जन्माला येणार बाळ देखील कोरोना पॉझिटिव्ह जन्माला आल्याचं समोर आलंय अश्या महिलांची जिल्हा रुग्णालयात च डिलेव्हरी होत असल्यानं , जळगाव जिल्हात आज पर्यंत 2 आणि धुळे येथील दोन बालकांचा मृत्यू झाला आहे.

गरोदर माता आणि मुलांनी कोणती काळजी घ्यावी ?

दुसऱ्या लाटेत कोरोना चा प्रसार अधिक होत आहे. यासाठी खासकरून गरोदर मातांनी आपली स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी परिवाराने ही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण आहेत. त्या भागात जाण्यास टाळावे, कोणतेही लक्षण आढळली तर डॉक्टरांना तातडीने संपर्क करावा, आहार आणि दिलेला व्यायाम वर भर द्यावा. असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

तसेच लहान मुलांमध्ये कोणतेही लक्षण दिसली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा , वेळ पडली तर तातडीने टेस्ट करून घ्यावी , वेळीच उपचार केला तर होणारा संभाव्य धोका टळू शकतो. मुलांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी टाळावं , लहान मुलंही मास वापरणं आवश्यक आहे. असा सल्ला बालरोग तज्ज्ञ डॉ. अजय शास्त्री यांनी दिला आहे

Full View
Tags:    

Similar News