मुंबई महापालिकेच्या शाळांचे पारंपरिक रुप बदलून आता ह्या शाळा चकाचक झाल्या आहेत. या शाळांनी कात टाकली आहे. तसेच विविध अभ्यासक्रमांचा समावेश केल्यामुळे आता महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ३५ हजारांनी वाढली आहे. एवढेच नाही तर आता बड्या बड्या अधिकाऱ्यांची मुलंही महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. या शाळांचा कायापालट कसा झाला याबाबत शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...