महिलांवरच्या सततच्या अत्याचारामुळं अस्वस्थ झालेल्या समीर वंजारी या पुण्यातील तरुणानं आपण महिला सक्षमीकरणासाठी काय करु शकतो याचा विचार सुरु केला व साकारलं ‘’घोर अंधेरा’’ हे गाणे.
पुण्यातील काही होतकरु तरुणांना एकत्र करत समीरने ‘’घोर अंधेरा’’ या गाण्याची संकल्पना व शब्द लिहिले. पियुष मिश्रा यांनी हे गाणे गायले असून यात दक्षिणेच्या काही कलाकारांनीही या गाण्यास हातभार लावला आहे. हे गाणं आज पुण्यातील समारंभात लोकार्पण केले जाणारे.
महिला सक्षमीकरणाचा केवळ महिलांनी विचार केला पाहिजे, असा विचार न करता या तरुण मुलांनी जे पाऊल उचललं आहे, त्यास मॅक्सवुमन पाठिंबा देत असून या कार्यक्रमास सपोर्टिंग पार्टनर म्हणुन आपली भूमिका बजावत आहे.