#AzadiKaAmritMahotsav : Ground Report : हर घर तिरंगा `खादी`च्या मुळावर
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकार 'हर घर तिरंगा' अभियान राबवत आहे, त्यासाठी केंद्र सरकारने ध्वजसंहिता बदलून पॉलीस्टर झेंड्यांना परवानगी दिली आहे. यामुळे खादी व्यवसायिकांना यंदा याचा मोठा फटका बसला. तिरंगा कुठलाही लावा हरकत नाही परंतु तिरंग्याचा अपमान होऊ देऊ नका अशी भावना गांधी बापूंच्या वर्ध्यातून खादी उत्पादक मंडळांनी व्यक्त केली आहे, प्रणय ढोले यांचा ग्राऊंड रिपोर्ट..;
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्याची योजना आखली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने ध्वजसंहिता बदलून पॉलीस्टर झेंड्यांना परवानगी दिली आहे. यामुळे खादी व्यवसायिकांना यंदा याचा मोठा फटका बसला. भारताचा तिरंगा हा भारताचा प्रतीक आहे आणि अश्यातच हा तिरंगा खादी या कापडा पासूनच तयार केल्या जायच्या परंतु यंदा केंद्र सरकारने संपूर्ण ध्वजसंहिता बदलून पॉलिस्टरला मान्यता दिल्यामुळे आता ही सुद्धा भीती वर्तवला जात आहे की पॉलिस्टर आणून खादी च अस्तित्व मिटवणार तर नाही ना...?
स्वातंत्र्याच्या चळवळीत वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम नाव लौकीक आहे. कारण याच सेवग्रमात बापूंचे आश्रम होते ज्याला त्या काळी बा-कुटी म्हणून ओळखल्या जायचे. महात्मा गांधीजी यांनी त्या काळी आचार्य विनोबा भावे यांच्या सोबत बसून चर्चा करून अनेक परिश्रम घेऊन चरखा तयार करून मग समोर त्यातून कापडा पर्यंत पोहचले. मात्र आता पॉलिस्टर ला मान्यता मिळाल्यानंतर एकंदरात नागरिकांमध्ये पण वेगळाच रोष बघायला मिळाला. सर्वांच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत आहे की, 'निदान राष्ट्रीय ध्वजला तर एक आयडेंटिटी राहू द्या'.
आता हातावर मोजून फक्त ५ दिवस या अभियानाला बाकी आहे आणि अश्यातच झेंड्याची मागणी संपूर्ण देशभरातून होत असल्याने ही पूर्तता खरच पूर्ण होऊ शकते का हा देखील एक मोठा सवाल उपस्थित होतो...? अशा वेळी निर्माण झालेली मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक खाजगी व्यावसायिकांनी उत्पादन सुरू केलं आहे. पॉलीस्टर च्या उत्पादकांना ही यामुळे मोठा फायदा होणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे.
खादी ग्रामोद्योग मंडळ वर्धा येथे खादीचे तिरंगे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर दिवस आणि रात्री सुरू आहे. दिवसाला ५ ते ६ हजार मीटर कापड तयार केल्या जातो आहे आणि रंगवल्या जातो आहे आणि हे झाल्यानंतर याच कापडाला शिवून नागपूर ला त्याच झेंड्यांवर अशोक चक्र प्रिंट करण्यासाठी पाठवल्या जातो. ते झाल्या नंतरच तो झेंडा विकल्या जातो आणि तेवढेच नव्हे तर त्यात हे सुद्धा बघितल्या जात की झेंडा दोनही बाजूने नीट दिसतो आहे का, प्रिंट झाला आहे का आणि तेव्हाच त्याला क्वालिटी चेक मिळून तो विकल्या जातो.
खादी मुळात हाताची कला असल्याने त्याला वेळ मूळात लागणारच कारण त्या मध्ये कुठले ही हय-गय न करता मन आणि भावनेनं बनवलल्या जाते. त्यातही राष्ट्रीय ध्वज बनवायचं आहे म्हंटल्यावर तो अजून नीट आणि अभिमानाने बणवावे लागतो. वर्धा जिल्ह्यात दर वर्षी किमान ३० ते ४० झंडे हे खादीचे विकल्या जायचे मात्र यंदा याची मागणी खूप मोठ्या स्तरावर असल्याने ते पूर्ण करता येईल की नाही याचा पण कुणाला ठाऊक नाही.ॉ
पॉलिस्टर हे संपूर्ण परराज्यातून आयात केल्या जात असल्याचे काँग्रेस नेते अजय कुमार यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्ठ केले होतेच. मग आता घरोघरी चीन निर्मित तिरंगा असणार का हा देखील प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहे..?
याबाबत खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अध्यक्षा करुण फुटाणे म्हणाल्या, आज हे स्पष्ट झाले आहे की देशाचा तिरंगा हा मोदीजींसाठी फक्त 'गमचा' आहे. मोदीजींना खादी काही फरक पडत नाही. तिरंग्याचा नेहमीच अपमान करणारे लोक आता खादी उद्योग उद्ध्वस्त करण्याचा कट रचत असल्याची भीती आम्हाला आहे. खादी उद्योगाशी संबंधित सुमारे १.५ कोटी लोक आपल्या देशात काम करत आहेत, त्यावर पंतप्रधान मोदींनी थेट हल्ला चढवला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोग, नागपूर कडून सुद्धा आम्हाला आमच्या मंडळाला तिरंगा बनून देण्याचा लक्ष्य दिला होता परंतु आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की आम्ही झेंड्याचा अपमान पैशांसाठी होऊ देणार नाही, We won't work quantity oriented but will work quality oriented.
मोदी सरकार घरोघरी जाण्याऐवजी चिनी बनावटीचा तिरंगा घरोघरी पोहोचवण्याचा विचार करत आहे. पॉलिस्टरचा तिरंगा चीनमधून बनवला जाईल किंवा चीनमधून पॉलिस्टर आयात करून तिरंगा देशात बनवला तर त्याचा फायदा चीनला होईल. आपल्या खादी ग्रामोद्योगात तिरंगा बनवला जातो आणि या उद्योगातून दहा कोटींहून अधिक लोकांना उपजीविका मिळते, असे , खादी ग्रामोद्योग मंडळाचे सचिव अतुल शर्मा म्हणाले
खादी विक्रेते आणि तिरंगा बनवणाऱ्या कारागिरांना फटका बसला पूर्वी तिरंगा फक्त खादीपासून बनवला जायचा. परंतु प्रत्येक घराघरात तिरंगा मोहिमेमुळे आणि खादी आयोगाला वेळेवर माहिती न दिल्याने पॉलिस्टर फॅब्रिकपासून तिरंगा निर्मिती आणि विक्रीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे खादी बनवणाऱ्या कारागीर आणि विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.५ दिवसात दिलेला लक्ष्य पूर्ण करणे पण शक्य नाही तरी देखील आम्ही प्रयत्न करू, असे मस्लिन खादी सेवाग्रामचे बळवंत ढगे म्हणाले.