दिव्यांग निधी वाटपात अफरातफर , लाभार्थीची कारवाईची मागणी
रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती अलका बामुगडे या वरिष्ठांच्या आदेशाला जुमानत नसुन त्यांच्यावर चौकशी होऊन कारवाई करण्याचा आरोप पीडित दिव्यांग भगिनी निशा मोरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे, आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...;
रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती अलका बामुगडे या वरिष्ठांच्या आदेशाला जुमानत नसुन त्यांच्यावर चौकशी होऊन कारवाई करण्याचा आरोप पीडित दिव्यांग भगिनी निशा मोरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना दिव्यांग भगिनीच्या नातेवाईक नम्रता मोरे यांनी माझ्या नणंद निशा मोरे या ६५% दिव्यांग असून त्यांना ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या ३ टक्के अपंग निधी मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप केलाय. याबद्दल रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अलका बामुगडे यांच्याकडे आपल्या नणंद निशा मोरे यांच्या दिव्यांग निधीचा विनियोगाची माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे मी रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना भेटले आणि ग्रामपंचायती कडून मला दिव्यांग निधीची माहिती देत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे ग्रामसेविका अलका बामुगडे यांना तत्काळ माहिती देण्याचे आदेश देण्यात आले. परंतू अलका बामुगडे यांनी मला माहिती देण्याऐवजी अडीच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. सदर प्रकरणाचा पाठपुरावा करू नका असे मला सांगण्यात आले.
त्यानंतर दि . २८ डिसेंबर २०१८ रोजी श्री . म्हसे व बामुगडे मॅडम यांनी दोन चेक दिले त्यातील पहीला चेक आरडीसीसी बँक दि. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी रक्कम रू .५०,००० / - ही निशा नारायण मोरे ६५ % अपंग हीच्या नावे तसेच बँक ऑफ इंडियाचा चेक दि . ३१ मार्च २०१८ रोजी रक्कम रू . १,२०,००० / - दिले. त्याबाबत आम्हाला सदरची बाब बँक ऑफ इंडिया वरील चेक नं . ०८४३४६ या धनादेशाची मुदत संपल्याने त्याबाबत आम्ही ताबडतोब ग्रामसेवक म्हसे आणि बामुगडे मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले दिले ते घ्या असे सांगितल्याने आम्ही दि .२८ डिसेंबर २०१८ रोजी मा. गट विकास अधिकारी पं.स. रोहा यांच्याकडे ३ % अपंग कल्याण निधी फसवणूक केल्याबाबत अर्ज केला परंतू आजपर्यंत रक्कम रू . १,२०,००० / - हा अपंग निधी माझी दिव्यांग नणंद निशा नारायण मोरे यांना मिळालेला नाही . त्याचा अपहार झालेला आहे . पुन्हा मा . ग्रामपंचायत रोठ बुद्रुक यांनी आम्हाला बोलावुन अपंग निधीचे रू . १,११,३०० / मात्र प्रत्येकास देणे असल्याबाबत बोलावले व आम्ही ग्रामपंचायत मध्ये जावुन सरपंच नितीन वारंगे यांनी आम्हाला रू .७५,००० / - चा चेक देऊन रू .३६ हजार रुपये येणे बाकी आहे . ते अद्याप आम्हास दिलेले नाहीत. तरी अपंग निधी चा सर्वात मोठा भ्रष्टाचार या ग्रामसेविका अलका बामुगडे यांनी केला आहे. तरी माझी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी सुरू करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आलीय. तसेच
यासंदर्भात तक्रारदार नम्रता मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे,सदर निवेदनात म्हटले आहे की माजी पालकमंत्री रायगड रविंद्रजी चव्हाण यांना सन २०१ ९ मध्ये ग्रुप ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होत असले बाबत दोन अर्ज दिले : १ ) ग्रामसेविका श्रीमती अलका बामुगडे यांनी रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याने रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करण्या बाबत .२ ) ग्रामपंचायत रोठ बुद्रुक , ता . रोहा , जि . रायगड या ग्रामपंचायतीमध्ये
१५ % , १० % , ३ % व इतर विकास कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाले असून संबंधीत सरपंच , उपसरपंच यांची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्या बाबत असे अर्ज केले होते . संबंधीत अर्जाची दखल माजी पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी घेऊन चौकशीचे आदेश दिले . त्या आदेशाला अनुसरून गट विकास अधिकारी पं.स. रोहा यांनी आम्हाला पत्र देऊन दि .१७ / १२ / २०१ ९ रोजी बोलावणे केले व आम्हाला मा.अतिरीक्त गटविकास अधिकारी ग्रामीण श्री . फडतरे व अतिरीक्त गटविकास अधिकारी श्री . राठोड , गटविकास अधिकारी श्री . जाधव यांनी त्यांच्या दालनात बोलावुन आम्हाला दराडावुन सांगितले की तुम्ही भ्रष्टाचार झालेबाबत पुरावे सादर करा , अन्यथा ग्रामपंचायत पारदर्शक असल्याबाबत व आपली काही एक तक्रार नसल्याबाबत लिहून द्या .
त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले साहेब आम्ही आपल्याला भ्रष्टाचार झाल्याबाबत चौकशी करण्याबाबत अर्ज सादर केलेले आहेत त्याबाबत आपण चौकशी करावी . आमच्याकडे पुरावे काय मागता असे म्हणून आम्ही त्यांना दोन अर्जाबाबत जबाब लिहून दिले . त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितले की , सदरची चौकशी होऊन तुम्हाला ग्रामपंचायत पारदर्शक असल्याबाबत पत्रव्यवहार करणार आहोत . आज पावेतो दोन वर्षे झाली तरी सुध्दा मा.गटविकास अधिकारी पं.स. रोहा यांच्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार केलेला नाही . याबाबत आम्ही मा.उपकार्यकारी अधिकारी रा.जि.प. अलिबाग श्रीमती पुंड मॅडम यांची सन २०२० मध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना हकीगत कळवली त्यावेळी त्यांनी त्यांचा क्लार्क बड़े साहेब यांना सांगितले की , आपण मा.गटविकास अधिकारी जाधव साहेब यांना फोन करून तक्रारदार यांचे समाधान करण्याबाबत सांगितले . परंतू श्री . बडे साहेब यांनी आम्हाला खाजगीत सांगितले की , आपण केलेले अर्ज याची कोणत्याही स्थरावर दखल घेतली जाणार नाही .
असे सांगुन आम्हाला परतावुन लावले . पुन्हा आम्ही दोन महीन्यानी रा . जि.प. अलिबाग येथे जाऊन आवक जावक कार्यालयात भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्याचे अर्ज केले. त्यावेळी आम्हाला श्री . बडे यांनी श्रीमती पुंड मॅडम यांना न भेटून देता सांगितले की श्रीमती अलका बामुगडे यांनी पंचायत समितीपासुन जिल्हा परिषद रायगड , मा . आयुक्त ग्रामविकास ( ग्रामीण ) कोकण भुवन यांना मॅनेज केले असून , आपल्या अर्जाचा कोणीही दखल घेणार नाही . तरी आपण पुन्हा कार्यालयात येऊ नका असे सांगुन आम्हाला परतावुन लावून याबाबत आजपावेतो कोणत्याही प्रकारे चौकशी किंवा कारवाई झालेली नाही .असे तक्रारदार नम्रता मोरे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आयुक्त ग्रामविकास ( ग्रामीण ) कोकण भवन यांना पुन्हा पुन्हा अर्ज केल्याने त्यांनी मोरे यांना पत्र देऊन सांगितले की , आपण पत्र व्यवहार करायचा असेल तर रा.जि.प. अलिबाग येथे करावे व त्यांना चौकशी बाबत कळवावे. त्यानंतर माहीती अधिकार : दि . १८ / ९ / २०१८ रोजी आम्ही ग्रामपंचायत रोठ बुद्रुक यांच्या कार्यालयात माहीतीचे अधिकारा बाबत दोन अर्ज सादर केले :
१ ) ग्रामपंचायत निधी सी . एस . आर . फंडातून विकास कामाची माहीती मिळणे बाबत .
२ ) ग्रामपंचायत निधीतून ३५ % , १५ % , १० % , ३ % खर्चाची माहीती मिळणे बाबत अर्ज सादर केले . तेव्हा मा.ग्रामसेविका मॅडम रोठ बुद्रुक ग्रामपंचायत यांनी दि . १२/१०/२०१८ रोजी आम्हाला पत्र दिले की सदरची माहीती आम्ही वेबसाईटवर टाकलेली असून , ती आपण पहावी . जर कां आपणास माहीती हवी असल्यास रक्कम रु .२०,००० / - स्वतः ग्रामपंचायत मध्ये येऊन भरणा करावी असे सांगुन आम्ही दि . १६/१०/२०१८ रोजी ग्रामपंचायत रोठ बुद्रुक येथे स्वतः जाऊन जी.एन. ( सामान्य ) पावती क्र .७० ९ / २०१८ अन्वये भरणा करून पावती घेतली . माहीतीच्या अधिकाराचे ३५ दिवस झाले तरी सुध्दा माहीती न मिळाल्याने आम्ही प्रथम अपील अधिकारी मा.गटविकास अधिकारी पं.स. रोहा यांना प्रथम अपील सादर केले . त्याची सुनावणी दि . १५/११/२०१८ रोजी आम्हाला न कळवताच किंवा पत्रव्यवहार न करताच मा . अतिरीक्त गटविकास अधिकारी श्री . गायकवाड साहेब यांनी सुनावणी घेऊन परस्पर निर्णय दिले . त्याबाबत माहीतीचा अधिकार अपील क्र . के . आर . ४००८/१८ अन्वये मा . राज्य माहीती आयोग कोकण आयुक्त यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करून संविधानाला न शोभणारे काम केले असल्याबाबत ठपका ठेवलेला आहे . मा . प्रथम अपील अधिकारी गट विकास अधिकारी पं.स. रोहा यांनी सुध्दा सदरची माहीती देण्याबाबत मा . जनमाहीती अधिकारी श्रीमती अलका बामुगडे यांना न सांगताच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने आम्ही दि .१८ / ९ / २०१८ रोजी माहीतीचा अधिकार दोन प्रकरण दाखल केले . त्यानंतर दि . ३१/१२/२०१८ रोजी मा.प्रथम अपील अधिकारी यांनी अर्ज क्र .१ याची २ ९ ४ पाने व अर्ज क्र . २ याची ७८४ पाने आम्हाला पोष्टाव्दारे दिली व त्याची सुनावणी दि . १७/१२ / २०१८ रोजी झाली .त्याचे आदेश : १ ) माहीती प्रमाणित करून देणे , २ ) रू .२०,००० / - फी कोणत्या आधारे घेतली त्याची १५ दिवसात खुलासा करणे ,
३ ) रू .२०,००० / - आकारूनही माहीती दिली नाही म्हणून शिस्त भंगाची कारवाई कां करण्यात येऊ नये याबाबत ३० दिवसात खुलासा सादर करावा . जर खुलासा सादर केला नाही तर आदेश गृहीत धरण्यांत येईल . त्यानंतर अर्ज क्र . २ : के.आर. ४४१०/१८ अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती नम्रता मोरे यांनी दिली.
पुन्हा मोरे यांनी माहीतीचा अधिकार अर्ज क्र . के . आर . १००३ / २०१ ९ , माहीतीचा अधिकार २५३३ / २०१ ९ , माहीतीचा अधिकार क्र .२५३४ / २०१ ९ दाखल करून त्याची सुनावणी दि .१७ / १२ / २०१ ९ रोजी मा.राज्य माहीती आयोग आयुक्त साहेब यांच्या दालनात होऊन माहीती देण्याबाबत व कारवाई करण्याबाबत आदेश झाले आहेत . ते आदेश अद्यापावेतो पेंडींग आहेत . असे तक्रारी निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर तक्रारदार मोरे यांनी माहीतीचा अधिकार तक्रारी अर्ज मा . वरीष्ठांना सादर केल्याने त्याची दखल घेऊन श्रीमती अलका बामुगडे व त्यांचा नातेवाईक श्री . म्हसे ग्रामसेवक वांगणी , ता.रोहा हे आमच्या घरी दि . २५/१२/२०१८ रोजी आले व त्यांनी सांगितले की ग्रामपंचाय रोठ बुद्रुक ही औद्योगिक वसाहतीत असल्याने तीचे उत्पन्न सुमारे २ कोटी व गावात ३ दिव्यांग आहेत असे सांगुन त्यांच्या निधींबाबत खाजगीत माहिती देऊन त्याबाबत आम्ही आपल्याला अपरोक्ष रू .२,५०,००० / - देत आहोत ते आपण स्वीकारून नियमाप्रमाणे आम्ही अपंग निधीचा निधी चेकव्दारे देत आहोत असे सांगितले, असता मोरे यांनी त्यांना सांगितले आम्हाला भ्रष्टाचाराचा पैसा नको व लाच आम्हाला नको असे बोलुन त्यांना घरातून जाण्यास सांगितले . त्यानंतर दि . २८/१२/२०१८ रोजी श्री . म्हसे व बामुगडे मॅडम यांनी दोन चेक दिले त्यातील पहीला चेक नं . ०५४१२४ आरडीसीसी बँक दि .२६ / ११ / २०१८ रक्कम रू .५०,००० / - ही निशा नारायण मोरे ६५ % अपंग हीच्या नावे तसेच बँक ऑफ इंडिया वरील चेक नं .०८४३४६ , दि . ३१/०३/२०१८ रक्कम रू . १,२०,००० / - दिले त्याबाबत आम्हाला सदरची बाब बँक ऑफ इंडिया वरील चेक नं . ०८४३४६ हा धनादेशाची मुदत संपल्याने त्याबाबत आम्ही ताबडतोब ग्रामसेवक म्हसे व बामुगडे मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले दिले ते घ्या असे सांगितल्याने आम्ही दि .२८ / १२ / २०१८ रोजी मा.गट विकास अधिकारी पं.स. रोहा यांच्याकडे ३ % अपंग कल्याण निधी फसवणूक केल्याबाबत अर्ज केला . आज पावेतो रक्कम रू . १,२०,००० / - अपंग निधी निशा नारायण मोरे हीस मिळालेला नाही . त्याचा अपहार झालेला आहे . पुन्हा मा . ग्रामपंचायत रोठ बुद्रुक यांनी आम्हाला बोलावुन अपंक निधीचे रू . १,११,३०० / मात्र प्रत्येकास देणे असल्याबाबत बोलावले . व आम्ही ग्रामपंचायत मध्ये जावुन सरपंच नितीन वारंगे यांनी आम्हाला रू .७५,००० / - चा चेक देऊन रू .३६,३०० / - येणे बाकी आहे . ते अद्याप पावेतो आम्हास दिलेले नाहीत .
तरी सदर मुद्यांप्रमाणे चौकशी करून संबंधीत ग्रामसेवक श्रीमती अलका बामुगडे , सरपंच , उप सरपंच रोठ बुद्रुक ग्रामपंचायत यांच्यावर शासन परीपत्रकाप्रमाणे भ्रष्टाचार झाला असल्यास कायदेशिर गुन्हा दाखल करण्यांत यावा अशी मागणी वजा विनंती तक्रारदार मोरे कुटुंबीयांनी केली आहे.
यासंदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती अलका बामगुडे यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतली असता दिव्यांग निधीच्या वाटपा संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांना दरवर्षी रक्कम समान येत नाही, जशी वसुली होते, त्यानुसार निधी वाटप केला जातो, यामध्ये 50 टक्के सार्वजनिक व 50 टक्के वैयक्तिक लाभ दिला जातो, आमच्या ग्रामपंचायतीत एकूण चार दिव्यांग लाभार्थी आहेत, या सर्वांचे 36000 रुपये देणे बाकी आहे. मुदातबाह्य धनादेश दिले यावर बोलताना सांगितले की खात्यात रक्कम नसल्याने चेक वटवता आले नाहीत, आम्ही सुधारित 75 हजार रुपयांचा धनादेश निशा मोरे यांना दिलेला आहे, शिल्लक रक्कम 36 हजार देणे बाकी आहे. 3% निधीत भ्रष्टाचार होत नाही असे ग्रामसेविका बामगुडे यांनी सांगितले,
यासंदर्भात आम्ही रोहा गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांचे म्हणणे जाणून घेतले असता त्यांनी सांगितले तक्रारदार नम्रता मोरे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीत सुपरवायजर ऑफिसर पाठवून वस्तुस्थितीची शहानिशा करून योग्य ती चौकशी केली जाईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. असे सांगितले.
-माहितीच्या अधिकाराच्या कागदपत्रांसाठी भरले वीस हजार, मात्र पेपर देण्यास अजूनही टाळाटाळ
-पंचायत समिती कार्यालयात खेपा मारून झिजल्या चपला
-आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या सूचना, मात्र स्थानिक प्रशासनाची डोळेझाक
-दिव्यांग मुलीच्या कुटुंबियांची तक्रारी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी