हमाली काम करणारा राहुल झाला चहा स्टॉलचा मालक

केल्यानं होत आहे आधी केलं पाहीजे या उक्तीचा आधार घेत सोलापूरमधे राहुल संतनाथ चपळगावकर यांनी कमी भांडवलात सुरू केलेला चहाचा व्यवसाय अनेकांसाठी फायदेशीर ठरणारा आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;

Update: 2022-07-19 14:46 GMT

वाढत्या बेरोजगारीने तरुणाई त्रस्त झाली असताना या बेरोजगारीतून मार्ग काढत वैराग येथील राहुल संतनाथ चपळगावकर या युवकाने हमालीचे काम सोडत स्वतःचा चहाचा स्टॉल सुरू करून बेरोजगार तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांना या चहाच्या स्टॉल मधून महिण्याकाठी 15 हजार रुपये मिळत असून त्याच्यातून त्यांचा घर खर्च भागून थोडेसे पैसे शिल्लक राहत आहेत. या चहाच्या स्टॉलवर दोघे पती-पत्नी राबत असून ते वैराग भागातील आसपासच्या आठवडी बाजारात चहा विकण्याचे काम करत आहेत. या कामात त्यांना पत्नीची मोलाची साथ लाभत आहे. बेरोजगारीच्या काळात राहुलने सुरू केलेला चहाचा व्यवसाय अनेकांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे. एकीकडे सरकार स्टार्टअप इंडिया या योजनेमार्फत तरुणांना रोजगारासाठी उभे करत आहे,असे सांगितले जाते.

पण या योजनेला म्हणावे तितकेसे यश येताना दिसत नाही. असाच प्रकार मुद्रा लोनच्या योजनेतही झाला असल्याचे दिसून येते. ती कितपत यशस्वी झाली असाही प्रश्न तरुणानातून विचारला जात आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँका तरुणांना कर्ज ही देत नाहीत. बँकांचे कर्ज मिळविण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने सहसा तरुण वर्ग बँकेकडे कर्जासाठी फिरकताना दिसत नाही. जर कर्ज मंजूर झाले तर ते लवकर दिले जात नाही. त्यामध्ये अनेकांचा वाटा ठरलेला असतो. त्यामुळे तरुणाईत कर्जाच्या बाबतीत एक प्रकारचा न्यूनगंड दिसून येतो. राहुल संतनाथ चपळगावकर यांनी कमी भांडवलात सुरू केलेला चहाचा व्यवसाय अनेकांसाठी फायदेशीर ठरणारा आहे. त्यामुळे या चहा विक्रेते पती-पत्नीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





 


राहुलने हमाली कामाबरोबरच किराणा दुकानात ही केले काम

राहुल चपळगावकर या युवकाने सुरुवातीच्या काळात कुटुंबाचा रहाट गाडा चालवण्यासाठी किराणा दुकानात काम करण्यास सुरुवात केली. त्यातूनही घर खर्च भागात नव्हता. त्यामुळे राहुल दुसऱ्या कामाच्या शोधत होता. त्याला काही काम मिळेना गेले होते. त्यानंतर त्याने किराणा दुकानातील काम सोडत हमालीचे काम करण्यास सुरुवात केली. हमालीचे काम करू लागल्यानंतर ही घर खर्च भागवण्यासाठी अडचणी येवू लागल्या होत्या. त्यामुळे राहुल चींताग्रस्त झाला होता. यातून मार्ग काढण्याचा विचार करत होता. पण मार्ग काही सापडत नव्हता. एकीकडे कुटुंबाच्या अडचणीत वाढ होत चालली होती. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दोघे पती-पत्नी विचार विनिमय करत होते. पण मार्ग काही सापडेना गेले होता. राहुलची पत्नी भाजी आणण्यासाठी वैरागच्या आठवडी बाजारात जात होती.

त्यावेळी त्यांना आठवडी बाजारात काही ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी मोकळी जागा असल्याचे दिसून आले. लागलीच त्यांच्या लक्षात आले,की आपण एवढ्या अडचणीतून जात आहोत,तर चहाचा व्यवसाय सुरू करण्यास काही हरकत नाही. तशा तर आपण घरीच बसून असतो,असा विचार करून त्यांनी आपल्या पतीला संध्याकाळी ही चहा विकण्याची कल्पना सुचवली. त्यांच्या पतीने चहा विकण्याच्या कल्पनेला लागलीच मंजुरी दिली. त्यानुसार त्यांनी वैरागच्या आठवडी बाजारात चहाचा स्टॉल सुरू केला. सुरुवातीला चांगल्या प्रकारे धंदा होवू लागला. यातून येणाऱ्या पैशातून घर खर्च भागून थोडेसे पैसे शिल्लक राहू लागले. त्यामुळे हा चहा विकण्याचा व्यवसाय त्यांनी कायम ठेवण्याचे ठरवले तर ठरवून गेल्या दहा वर्षापासून ते चहा विकण्याचे काम करत आहे.

गेल्या दहा वर्षापासून आठवडी बाजारात चपळगावकर दांपत्य चहा विकण्याचे करतात काम

चपळगावकर पती पत्नी गेल्या दहा वर्षापासून आठवडी बाजारात चहा विकण्याचे काम करत आहेत. सुरुवातीच्या काळात वैरागच्या बाजारात चहा विकण्याचे काम केले. त्या ठिकाणी या व्यवसायात स्पर्धक निर्माण झाल्याने चहाचा व्यवसाय कमी आला होता. त्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी काहीतरी करणे जरुरीचे होते. त्यासाठी दोघा पती-पत्नीने विचार विनिमय करण्यास सुरुवात केली. विचारविनिमय करण्यात थोडेसे दिवस गेल्यानंतर वैराग भागाच्या आसपास असणाऱ्या आठवडी बाजारात चहा विकण्याचे ठरवले. त्यानुसार सुरुवातीला त्यांनी साहित्य बाजारात घेवून जाण्यासाठी भाड्याने ओमिनी कार ठरवली.

आठवडी बाजारात चहाचा स्टॉल लावण्यासाठी साहित्याची जळवाजुळव केली. त्यासाठी फोल्डींगचा टेबल बनवण्यात आला. गॅस, शेगडी आणि इतर साहित्य गोळा करून आठवडी बाजारात स्टॉल लावण्यात आला. सुरुवातीला आठवडी बाजारात या चहाच्या स्टॉलला लोकांच्या चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागले. या आठवडी बाजाराच्या पैशातून पुन्हा संसाराचा गाडा सुरळीत चालण्यास मदत झाली. त्यानंतर या चपळगावकर दांपत्याने मागे वळूनच पाहिले नाही. गेल्या दहा वर्षापासून आठवडी बाजारात चहा विकत आहेत. या चहा बरोबरच ते बिस्कीट आणि इतर खाण्याचे साहित्य विकत आहेत. त्यातून ही हे दांपत्य पैसे मिळवत आहे. महिन्याकाठी सर्व खर्च जावून महिन्याला पंधरा हजाराच्या आसपास त्यांना फायदा होत आहे. सुरुवातीला भाड्याच्या ओमनीने प्रवास करणाऱ्या या चपळगावकर पती-पतीने आता स्वतःची ओमिणी गाडी खरेदी केली असून त्यांचा हा चहाचा व्यवसाय सध्या सुरळीत सुरू आहे.




 


चहाच्या विक्रीतून दोघा पती-पत्नीला मिळतात एक हजार रुपये

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना चहा विक्रेते राहुल चपळगावकर यांनी सांगितले,की चहाचा व्यवसाय आम्हा दोघांना सहज सुचला होता. वैरागच्या बाजारात एके ठिकाणी जागा रिकामी होती. घरचे म्हणाले,की आपण चहाचा स्टॉल टाकू. त्यानुसार चहाचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अडचणी आल्या,पण त्यानंतर गेल्या दहा वर्षापासून हा व्यवसाय सुरळीत पणे चालत आहे. सध्या आम्ही आठवडी बाजारात चहा विकत आहोत. यामध्ये अनगर,नरखेड,वैराग,वडाळा, कळमण या आठवडी बाजाराचा समावेश होतो. यातून आम्हाला महिन्याकाठी जेमतेम पैसे मिळत आहेत.

Tags:    

Similar News