आज वस्तू आणि सेवा कराच्या(जीएसटी) वर्षपूर्तीनिमित्त भाजपाकडून देशभरात ‘जीएसटी दिन’ साजरा केला जात आहे. तर देशभरातून व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. काय म्हटलेत व्यापारी पाहा हा व्हिडीओ...
वर्षभरात जीएसटीमुळे झालेले परिणाम
जीएसटी लागू झाल्यानंतर आता वर्षभरात देशभरातील करदात्यांची संख्या 1.20 कोटी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा आकडा 9.10 लाख आहे. राज्यातील करदात्यांचा वाटा 7 टक्क्यांवर आला आहे. एकीकडे देशातील जीएसटीदात्यांची संख्या 56 लाखांनी वाढली असताना राज्यातील ही वाढ फक्त 60 हजारांइतकी आहे. जीएसटी करप्रणालीनं सरकारच्या तिजोरीवर जास्त भार पडलेला नाही. उलट करदात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जीएसटी करप्रणालीमुळे महागाई वाढल्याचं समोर आलं आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षात न आणल्यामुळे इंधनाचे भावही भडकले आहेत.