एकीकडे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तर उत्तर महाराष्ट्रात, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. पण अजूनही इथे पावसाचा पत्ता नाहीये. त्यामुळे पिकांनी मान टाकली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना चारा देखील मिळत नाहीये.
कृत्रिम पावसाचा निर्णय सरकारने अजूनही घेतलेला नाही. त्यात आता पाऊस पडला तरी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल. पण हातची गेलेली पिकं पुन्हा येणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने कागदी घोडे न नाचवता तातडीने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील भीषण परिस्थिती मांडणारा सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...