मंदी ही चिंताजनक बाब असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत रिजर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांनी नुकतंच व्यक्त केलं होतं. देशाला आर्थिक सुधारणांची गरज असून थातूर-मातूर उपायांनी यावर दिलासा मिळू शकणार नाही, उर्जा आणि बँकेतर वित्तीय संस्थांच्या क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे आणि सरकारने यावर तात्काळ काम केलं पाहिजे असं मत राजन यांनी व्यक्त करत जीडीपी मोजण्याच्या बदललेल्या पद्धतीवरही राजन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर रघुराम राजन यांनी आता सरकारच्या एकूण आर्थिक निती बाबत एका ब्लॉग मध्ये भाष्य केलं आहे.
सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांचे सरकार ऐकून न घेता योजना तयार करत असून त्यात चुका होत आहेत. मात्र, टीका करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं तोंड बंद करायला सांगितलं अथवा टीका करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं तर लोक चुका दाखवणे बंद करतील. त्यानंतर सरकार तोपर्यंत आनंदी राहू शकतं जोपर्यंत त्याचे वाईट परिणाम समोर येणार नाहीत. सत्य फार काळ नाकारता येणार नाही. असं म्हणत अलिकडच्या वाढलेल्या ट्रोल संस्कृती बाबत रघुराम राजन यांनी चिंता व्यक्त केली असून सरकार टीका करणाऱ्यांचं तोंड ट्रोल र द्वारे बंद करत असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा :
मंदी चिंताजनक : नवीन आर्थिक सुधारणांची गरज – रघुराम राजन
समान संधी नसल्याने भांडवलशाही धोक्यात: रघुराम राजन
इतिहासात गुंग राहिल्याने देशाची क्षमता वाढणार नाही...
इतिहासात (Historical Achievements) रममाण होणं, परदेशी विचारांना विरोध आणि त्यांच्याबद्दल असुरक्षिततेची भावना आर्थिक विकासावर वाईट परिणाम करते. सरकार वर केल्या जाणाऱ्या खुल्या टीका सरकारसमोर सत्य मांडण्याची संधी देतात. इतिहास समजून आणि उमजून घेणं ही चांगली बाब आहे. मात्र, नेहमीच इतिहासात रमून जाणं असुरक्षितता दाखवते. यामुळे आपली सध्याची ताकद वाढण्यास मदत मिळत नाही.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार (PMEAC) परिषदेनं सरकारच्या योजनांवर टीका करणाऱ्या दोन सदस्यांना हटवण्यावरून विचारलं आहे. यावर देखील रघुराम राजन यांनी सरकारने टीका करणाऱ्याचं ऐकायला हवं असं म्हणत अशा प्रकारे कारवाई केली गेली तर नोकरशाह (Bureaucrats) सरकार समोर सत्य मांडू शकत नाही. अशा कारवायांमुळे त्यांच्या मध्ये हिंमत येत नाही.
नक्की वाचा:
जगाच्या हिता ऐवजी देश फक्त स्वत:चा विचार करत आहेत...
रघुराम राजन यांच्या मते वित्तीय क्षेत्र (Financial Sector) हा चिंतेचा विषय नाही. खरंतर व्यवसायात मंदीसोबतच जागतिक गुंतवणूक (Global Investment) हे चिंतेचं खरं कारणं आहे. सध्या सर्व देश जागतिक स्थितीचा विचार न करता फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करत आहेत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं आहे.
सरकारने हे लक्षात घ्यायला हवं की, जुन्या समस्यांना दुरुस्त केल्यानं नवीन समस्या येणार नाही असं कधीही होत नसतं.