मोदी सरकारची अघोषित गोल्डबंदी? सराफांचा राज्यव्यापी बंद

Update: 2021-08-23 13:30 GMT

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती केली आहे. पण त्यामुळे व्यापाऱ्यांना केंद्र सरकारने कारकून बनवून टाकले आहे, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे. सराफ व्यावसायिकांनी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारला होता. केंद्र सरकारच्या विरोधात असलेल्या या बंदमध्ये जळगाव शहरातील १५० तर जिल्हाभरातील दोन हजार सराफा दुकाने सहभागी झाले आहेत. हॉलमार्किंग सक्तीमुळे सुवर्ण व्यावसायिकांकडे जितके अलंकार, सोने-चांदी आहे, त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वस्तू सापडल्यास संबंधित व्यावसायिकावर कारवाई केली जाऊ शकते.



 

त्यामुळे इन्स्पेक्टर राज येईल, अशी भीती सराफांमध्ये आहे. केंद्र सरकारने ही जाचक अट रद्द करावी, अशी मागणी सराफ व्यावसायिकांनी केली आहे. या सक्तीमुळे सराफ व्यवसाय देशोधडीला लागेल, छोटे-मोठे व्यावसायिक आधीच अडचणीत आहेत. त्यांना उभारी देण्याऐवजी केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने वागत आहे, असेही सराफांचा आरोप आहे. तसेच हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरच्या नोंदणीसाठी दागिने काही दिवस सरकारी कार्यालयात ठेवावी लागणार आहेत, त्यामुळे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी अशीही मागणी सराफांनी केली आहे.

Tags:    

Similar News