पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे साईड-इफेक्ट्स

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगणाला भिडल्यानं महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यातच आता पेट्रोल भरून पैसे न देताच पळून जाण्याच्या देखील घटना वाढल्या आहेत...;

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-05-08 09:17 GMT
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे साईड-इफेक्ट्स
  • whatsapp icon

 पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून अतिशय धक्कादायक घटना घडत आहेत. यामुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.गेल्या दोन महिन्यापासून विविध ठिकाणी एक कार पेट्रोल पंपा वर टाकी फुल करायला सांगतात, आणि टाकी फुल झाल्यानंतर पैसे न देताच ते भरधाव वेगाने निघून जातात, असा प्रकार गेल्या दोन महिन्यापूर्वी शेगाव येथील बाबजी पेट्रोल पंप व गजानन सर्विस सेंटर येथे घडलाय. त्याचा सीसीटिव्ही व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. शेगाव येथे कार मध्ये बसलेल्या काही अनोळखी व्यक्तींनी पेट्रोल टाकी फुल करून घेतली आणि तेथून पोबारा केला.




 


त्यानंतर नांदुराखामगाव, आणि दोन दिवसापूर्वी आंबेटाकळी येथील दोन पेट्रोल पंप, अश्या विविध ठिकाणी असा प्रकार घडल्याचं समोर आलंय.पेट्रोल पंपावर कार ची टाकी फुल करून पळ काढला जातो, कार मध्ये बसलेल्या व्यक्तींच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने त्यांना आजपर्यंत कुणीही ओळखलेले नाही. मात्र हे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक असावेत आणि गुन्ह्यात ही कार वापरली जात असावी असा संशय व्यक्त केला जातोय.




 


त्यासंदर्भात आजपर्यंत जिल्ह्यात चार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, तर अजूनही काही तक्रारी दाखल होणार असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पूर्णतः भितीचे वातावरण पसरले आहे. अशावेळी त्यांच्या पगारातून पैसे कपात होत असल्याने,त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. त्यामुळे पोलिसांनी आता या टोळीचा शोध घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

Full View

Tags:    

Similar News