रक्तानं पत्रे लिहली तरीही रस्ता झालाच नाही..

रस्ते ही दळणवळणाची महत्वाची साधने असताना सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह राज्य महामार्ग यांची दुरवस्था झाली असल्याचे पहायला मिळत आहे.अनेक रस्त्यावर खड्डे पडले असल्याचे दिसते.रस्ते जर चांगले असतील तर त्या भागात सुविधा पोहचण्यास मदत होते.आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता येते. रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघात झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.अशीच अवस्था सोलापूर जिल्ह्यातील कुरुल-पंढरपूर रस्त्याची झाली असल्याचे दिसते;

Update: 2022-01-29 08:15 GMT

रस्ते ही दळणवळणाची महत्वाची साधने असताना सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह राज्य महामार्ग यांची दुरवस्था झाली असल्याचे पहायला मिळत आहे.अनेक रस्त्यावर खड्डे पडले असल्याचे दिसते.रस्ते जर चांगले असतील तर त्या भागात सुविधा पोहचण्यास मदत होते.आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता येते. रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघात झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.अशीच अवस्था सोलापूर जिल्ह्यातील कुरुल-पंढरपूर रस्त्याची झाली असल्याचे दिसते.रस्त्यावर खड्डे पडले असून तीर्थक्षेत्र पंढरपूरला जाणार रस्ता असल्याने चांगल्या प्रतीचा बनवण्यात.यासाठी अनेक राजकीय पक्ष,सामाजिक संघटना यांनी आंदोलने केली. 21 फेब्रुवारी 2021 रोजी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकामंत्री यांना रक्ताने लिहलेली पत्रे पाठवून आमच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यानंतरही संबंधित मंत्री यांनी कोणतीच दाखल घेतली नाही.त्यामुळे 23 जुलै 2021 रोजी कुरुल येथील शिवाजी चौकात पावसाच्या पाण्याने भरलेल्या 2 फूट खड्यात 70 जणांनी रक्तदान करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.तरीही गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला जाग आली नाही.असा घणाघात हा रस्ता व्हावा,यासाठी सातत्याने आंदोलन,मोर्चे करणारे कुरुल गावचे रहिवाशी सुहास घोडके यांनी बोलताना केला.

पंढरपूरला जोडणारे सर्व महामार्ग चांगल्या प्रतीचे झाले मग कुरुल-पंढरपूर का नको ?

कुरुल-पंढरपूर रस्त्याने येणारा वारकरी भाविक हा आंध्र प्रदेश, कर्नाटक, तुळजापूर,अक्कलकोट, गाणगापूर या तिर्थक्षेत्रांना भेट देऊन सोलापूर मार्गे पंढरपूरला येताना कुरुल-पंढरपूर रस्त्याने जातो.पण या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने त्यांना तारेवरची कसरत करत पंढरपूर गाठवे लागते.त्यातच या रस्त्यावर टाकळी सिकंदर येथे साखर कारखाना असल्याने ऊसाच्या गाड्याची वाहतूक असते.रस्ता अरुंद असल्याने वाहनधारकाना अडचणींना तोंड देत वाहने घेऊन जावी लागत आहेत.पंढरपूरला जोडणारे रस्ते चांगल्या प्रतीचे झाले आहेत.पुण्यावरून पंढरपूरला येणाऱ्या रस्त्याचे काम थोड्याफार प्रमाणात होण्याचे राहिले आहे. तर कोल्हापूर, मिरज,सांगली येथून सांगोला मार्गे येणारा रस्ता चांगल्याप्रकारे केला गेला आहे. कऱ्हाड-पंढरपूर रस्ता ही चांगला बनवला गेला आहे.सातारा-पंढरपूर रस्त्याचे काम झाले असून हा ही पंढरपूरला जोडणारा महत्वाचा दुवा असणारा रस्ता चांगल्या प्रतीचा बनविला गेला आहे.तर मोहोळ-पंढरपूर महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.त्यामुळे पंढरपूर तीर्थक्षेत्र हे चोहोबाजूंनी महामार्गानी जोडले गेले आहे.पण पंढरपूरला जोडणारा कुरुल-पंढरपूर रस्त्याचे काम होत नसल्याने या रस्त्यावरील गावच्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.पंढरपूर चांगल्या प्रकारच्या महामार्गानी जोडले गेले मग कुरुल-पंढरपूर रस्ता का बनवला जात नाही असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.

36 किलोमीटर रस्त्याचे पूर्ण काम आजपर्यंत झालेच नाही

पंढरपूर-कुरुल हा राज्य मार्ग असून या रस्त्याचे पूर्ण काम गेल्या अनेक वर्षांपासून झाले नाही.कुरुल-पंढरपूर रस्त्यावर अंकोली,टाकळी सिकंदर,सुस्ते, तारापूर व पंढरपूर तालुक्यातील काही गावे आहेत.या गावातील वृद्ध माणसे सांगतात की,जसे आम्हाला कळत आहे,तसे या 36 किलोमीटर रस्त्याचे पूर्ण काम कधीच झाले नाही.या रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा आहे.रस्त्याचे काम व्हावे यासाठी अनेक आंदोलने केली. पण झोपेचे सोंग घेतलेल्या महाविकास आघाडी सरकारला घाम फुटला नाही.आंदोलने,मोर्चे झाले तरीही रस्त्याचे काम झालेच नाही.मोहोळ मतदार संघात आमदार यशवंत माने काम करतात.तर माढा मतदार संघात आमदार बबनदादा शिंदे काम करतात.हा रस्ता या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघातून जातो.त्यामुळे हा प्रश्न या दोन आमदारांचा आहे. मात्र प्रयत्न चालू आहे एवढेच ऐकायला मिळत आहे.याच्यापुढे त्यांच्याकडून कोणतेच उत्तर येत नाही.असे सुहास घोडके यांनी बोलताना सांगितले.

आंदोलने केली तर विशिष्ट पक्षाचा डाग लावण्याचा प्रयत्न

आंदोलनकर्ते सुहास घोडके यांनी सांगितले की,आम्ही सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या व्यथा जाणून पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवला.त्याच्याही पुढे जाऊन समाजाच्या हितासाठी आंदोलने केली.तर मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी विशिष्ट पक्षाचा डाग लावण्याचा प्रयत्न केला.कुठल्यातरी पक्षाचे प्रवक्ते पद घेऊन काम करतोय.पत्रकारिता करतोय,पत्रकारीताच करावी.त्यांनी अशी वेगवेगळी विधाने केली आहेत.थोडक्यात त्यांनी माझे कौतुक केले आहे.असे म्हणण्यास काही हरकत नाही.

रस्त्याच्या कामासाठी 200 ते 250 कोटी रुपयांचा निधी आवश्यक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे की,रस्त्याच्या पूर्ण कामासाठी 200 ते 250 कोटी निधी आवश्यक आहे.इतक्या निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभाग करू शकत नाही.फार तर आम्ही रस्त्याच्या कडेला असणारी दुतर्फा झाडे काढून टाकू.रस्त्यावर जे मोठं-मोठे खड्डे आहेत,ते बुजवू शकतो. त्याच्यावर डांबर टाकायला ही आमच्याकडे पैसे नाहीत.गेल्या वर्षी जे खड्डे बुजवले होते.त्यांची बिल देखील शासनाने दिली नाहीत.त्याच्यामुळे आमच्याकडे पैसे नाहीत.असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितल्याचे सुहास घोडके यांनी सांगितले.

रस्त्यावरून शिवसेना,भाजप,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही कार्यकर्ता जातो पण रस्त्याचा प्रश्न लक्षात येत नाही

या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाली आहेत.या रस्त्यावरून शिवसेना,भाजप,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते जातात.पण त्यांच्या लक्षात रस्त्याचा प्रश्न येत नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्ता होईल असे सांगतात.हिवाळी अधिवेशनात कुरुल-पंढरपूर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आमदार यशवंत माने यांचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत होते.पण हिवाळी अधिवेशनात आमदार यशवंत माने यांनी रस्त्याचा कोणताही प्रश्न मांडला नाही.त्यामुळे त्यांचा निषेध करतो.खरे तर रस्ता झाला पाहिजे,ही आमची प्रामुख्याने मागणी आहे.कारण की हा रस्ता ज्यावेळेस चांगल्या प्रकारचा होता,त्यावेळेस या रस्त्यावर असणाऱ्या कामती,अंकोली, टाकळी सिकंदर,सुस्ते येथील चौकातील दुकाने,हॉटेल व्यवसाय भरभराटीला आला होता.परंतु रस्ता घराब झाल्याने व प्रवाशी संख्या घटल्याने या रस्त्यावरील उद्योग-व्यवसाय मोडकळीस आल्याचे पाहायला मिळत असल्याचे सुहास घोडके यांनी सांगितले.

पंढरपूर कार्यालयाकडून रस्त्याच्या कामाचे प्रपोजल गेले

कुरुल-पंढरपूर रस्त्याच्या कामाचे पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रपोजल गेले असून येत्या बजेट मध्ये 200 ते 250 कोटींची तरतूद होण्याची शक्यता आहे.याबाबतची अधिक माहिती पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मिळेल अशी माहिती मोहोळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गणेश क्षीरसागर यांनी दिली.

आमदारांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले

मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत माने यांच्याशी फोनवर कुरुल-पंढरपूर रस्त्याच्या कामासंदर्भात विचारले असता प्रतिक्रिया देण्याचे टाळून फोन स्विच ऑफ केला.

Full View

Tags:    

Similar News