नागपूर ते मुंबई प्रवास कमी कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून जाणारा टप्पा १ मे २०२१ पर्यंत खुला करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन टप्प्यांमध्ये पळशी, सावंगी या गावांजवळ या मार्गावर बोगदा तयार करण्यात आला आहे. सध्या या बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा मराठवाड्यातील पहिलाच बोगदा असणार आहे. या बोगद्याचे काम कसे सुरू आहे याचा आढावा घेतला आहे, आमचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांनी...