टरबुजाचं मार्केट 'डाऊन'

मागच्या लॉकडाऊन पासून टरबुज्याची चर्चा आहे. यंदा ही टरबूजामुळे डोकेदुखी वाढली आहे. टरबुजाचे दिवस जोरात असले तरी टरबुजाचं एकूण मार्केट मात्र डाऊनच आहे !;

Update: 2021-03-22 06:02 GMT

Courtesy -Social media

औरंगाबाद: अतिवृष्टी आणि त्यांनतर अवकाळी या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा कोरोनाचा संकट छाताडावर येऊन उभा राहिला आहे.कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आली आहे,यात आठवडी बाजारपेठाही बंद ठेवण्याचा निर्णय अनेक जिल्ह्यात घेण्यात आले आहे. यामुळे याचा मोठा फटका टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे.

औरंगाबादच्या कुतुबखेडा येथील पठाडे यांनी गेल्यावेळी शेतात टरबूज लावलं आणि अचानक लॉकडाऊन लागलं त्यामुळे माल विकलाच नाही. आता पुन्हा नव्या जोमाने दोन एकरमध्ये टरबूज लावून दोन पैसे येईल अशी अपेक्षा रमेश पठाडे यांना होती.मात्र आता आठवडी बाजारच बंद असल्याने ते हतबल झाले आहे. त्यामुळे मागच्या लॉकडाऊन पासून टरबुज्याची चर्चा आहे. यंदा ही टरबूजामुळे डोकेदुखी वाढली आहे. टरबुजाचे दिवस जोरात असले तरी टरबुजाचं एकूण मार्केट मात्र डाऊनच आहे.

कोळगे यांच्यासारखीच परिस्थिती राज्यातील अनेक टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. उन्हाळ्यात टरबूजला चांगलं मार्केट असतं, दोन पैसे ही शेतकऱ्यांच्या पदरात पडतात त्यामुळे चांगलं मार्केट मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना यावर्षी होती. मात्र कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रमाणे आत्ताही टरबूज मार्केट डाऊन असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.

टरबूज उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे काकडी,खिरे उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती आहे.शेतात मोठ्याप्रमाणात माल निघत असताना बाजारपेठ मिळत नाही. याचाच फायदा घेत व्यापारी कवडीमोल भावात माल मागत असल्याने विकायला सुद्धा पुरत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील चिंचोली गावातील दिनकर कोळगे यांना साडेतीन एकर जमीन आहे. शेती करूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर खरीप हंगामात लावलेल्या कापसाला अतिवृष्टीने आणि नंतर अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने त्यांच्या हातात रुपया पडला नाही त्यामुळे किमान उन्हाळी पीकातून दोन पैसे मिळतील म्हणून कोळगे यांनी एक एकरात काकडीच पीक लावलं.चांगली मेहनत घेतल्याने पीक ही चांगलं आलं, मात्र काकडी विक्रीसाठी निघाली आणि लॉकडाऊनची घोषणा झाली, त्यात आठवडी बाजार सुद्धा बंद असल्याने आता कोळगे हतबल झाले आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने कोळगे आणि त्यांचा मुलगा मनोहर गावातील शिवारावर काकडी विकण्यासाठी घेऊन बसले आहे.मात्र गेल्या आठवड्या भरात 500 रुपये सुद्धा त्यांना यातून मिळाले नाही.त्यामुळे आता शेतातील काकडी फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

नुकताच केंद्र सरकारने कृषी कायदा लागू केला असून, त्याप्रमाणे शेतकरी आपला माल खाजगी कंपनीला सुद्धा विकी शकतो.पण केंद्राचा हा कायदा कागदावरच आहे का? किंवा अस्तिवात असेल तरीही शेतकऱ्यांना त्याची अजूनही माहिती नाही, त्यामुळे शेतातील माल विकावे कुठं असा प्रश्न कोळगे विचारताहेत.

Tags:    

Similar News