वेळेवर पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल; हवामान खातं देतयं हुलकावणी...

Update: 2022-06-08 09:52 GMT

हवामान खात्यानं सांगितलं होतं की 7 जूनला पाऊस येईल मात्र पाऊस एकही न पडल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे.... अजून पर्यंत जिल्ह्यात एकही पाऊस चांगला असा पडलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याने 12 जून ही तारीख दिली आहे परंतु अजूनही पाऊस हुलकावणी देतो की काय...? व शेतकऱ्यांनी बी-बियाणे खते खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. त्याचबरोबर जून महिन्यातील 7 तारखेला पडलेल्या पावसानं शेतीची मशागत करता येते व पिकाची मृग नक्षत्रामध्ये पेरणी झाल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ होते त्यामुळे मृग नक्षत्रात पडलेला पाऊस शेतकऱ्यासाठी फायद्याचा असतो याविषयी मॅक्स महाराष्ट्राचा एक स्पेशल रिपोर्ट...

आम्ही लहान असताना पाऊस भरपूर पडत होता झाडं-झुडपं ही भरपूर होते पाऊस भरपूर पडायचा त्यावेळेस लोकसंख्या कमी होती आता भरमसाठ लोकसंख्या वाढली आहे. पाऊसही लवकर वेळेवर पडत नाही त्यामुळे उपाशी मरण्याची वेळ आली आहे. आम्ही लहान होतो त्यावेळी घोंगड्यांना असाड्या या पडत होत्या एवढा पाऊस येत होता. धान्य भरपूर होतं आणि लोकसंख्या कमी होती त्या मानाने लोकसंख्या वाढली आहे. पण पाऊस वेळेवर पडत नाही त्यामुळे अशी फजिती चालली आहे. आमच्या लहानपणी जनावरे भरपूर असायचे त्यामुळे शेणखत पडायचं. त्यातून जमीन चांगली पिकाची गावरान खायला मिळत होतं त्यामुळे त्याच्यामध्ये चांगली चव असायची आता भरपूर पीकतयं मात्र त्याच्यात चव नाही.




 


पाऊस वेळेवर पडत नसल्यामुळे मूग उडीद भुईमूग कापूस या पिकाची वेळेवर लागवड न झाल्यास त्यातून उत्पन्न निघत नाही. त्यामुळे लोकांची पंचाईत होत आहे त्या काळात पाऊसही भरपूर पडायचा व उत्पन्नही चांगलं निघायचं .आम्हाला तर शेंगा एवढ्या वयाच्या की आम्हाला न्यायची पंचायत व्हायची .आता तर त्याला डुक्कर लागले आहेत दुसरे प्राणीही त्याला त्रास देत आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांपुढे मोठं आव्हानच आहे, असं शामराव यशवंतराव प्रभाळे म्हणाले.

पावसाचा एकही थेंब पडलेला नाही त्यामुळे नांगरट कशी मोडायची खत बियाणे आणायचं पण पाऊस पडला नाही त्यामुळे आणायचं पण कसं अजून 15 दिवस जर पाऊस लांबला तर बी बियाणे आणून घरात कसं ठेवायचं कापसाची बॅग महाग आहे सोयाबीनची बॅग महाग आहे मग हे आणून तरी ठेवा व कसं...? पाऊसच जर पडला नाही तर मी बियाणे आणून ठेवायचं तरी कुठं...? असं विमल अर्जुन चित्रे यांनी सांगितले.

हवामान खात्याला सांगितलं होतं की या वर्षी लवकर पाऊस पडणार आहे. लवकर पाऊस आला नाही त्यामुळे खत बी बियाणे आणलंच नाही. जर पाऊस लांबला तर आणायची तरी कसं...? यावर्षी अजून पीक कर्ज मिळालेलं नाही त्यामुळे पीक आणायला अडचणी येत आहेत.जर पाऊस पडला तर बी-बियाणं आणता येईल जर नाही पडला. तर असच ठेवावं लागेल खताचे व बियाण्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पाऊस पडल्यावरच आणता येईल. दिवस जर पाऊस वाढला लांबला तर बियाणे आणून तरी करायचं काय...? पिक कर्ज अजून वाटप झालेलं नाही असं अर्जुन शामराव चित्रे यांनी सांगितलं.




 


हवामान खातं दररोज सांगते की पाऊस आज येईल .उद्या येईल बातम्यांमध्ये सांगितलं जातंय की पावसाला अडथळा येत आहे. शेतीची नांगरट करून ठेवली आहे नांगरटी साठी दोन हजार रुपये प्रति एकर प्रमाणे ट्रॅक्टरला पैसे द्यावे लागले आहेत. त्याचबरोबर मशागतीसाठी मजूर मिळत नाही, तसेच हवामान खाते रोज वेगळा अंदाज सांगत आहे. दररोज वेगळा अंदाज सांगत आहे त्यामुळे शेतामध्ये काय करावे हीच शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण आहे. बियाणे खरेदी करावे की नाही पैशाची अडचण मजुराची अडचण अगोदरच नांगरणीसाठी दोन हजार रुपये प्रती एकर पैसे टाकले आहेत. बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत बँकेमध्ये चकरा मारत आहोत. पीककर्ज मिळत नाही बँक दररोज वेगळा कागद सांगत आहे आज या उद्या या असं सांगत आहे .त्यामध्ये हवामान खातं असं मार्केटमध्ये बोगस बियाणे आले आहेत. त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांना कुणाकडे पहावं हेच आम्हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा आहे. आम्ही नेमकं ऐकावं कुणाचा हवामान खात्याचा ऐकावं की मनाचं करावं. हेच आम्हाला सध्या सुचत नाही .

बँकेचा कर्ज काढावं तर मध्येच अवकाळी पाऊस येऊन जातो. शेतकरी असाच मरत चाललाय उत्पन्न व्यवस्थित नाही उत्पन्न आलं तर त्याला भाव योग्य मिळत नाही .सोयाबीन तर ऐक एक वेळी उगवतच नाही पुन्हा आम्हाला दुबार पेरणी करावी लागते मोठा प्रश्न आमच्यापुढे उभा राहतो. नांगरणीसाठी 5 एकरला दहा हजार रुपये पेरणीसाठी दहा हजार तिलाच शेतामध्ये वीस हजार रुपये टाकावे लागतात. मग उत्पन्न निघणार काय त्यातून खायचं काय विकायचे काय...? आणि ठेवायचं काय...? मजूर लावायचे काय करावे आणि कसे करावे हेच आमच्या लक्षात येत नाही. शेतीला पैसा लावायचा कसा हाच प्रश्न आमच्यापुढे उभा आहे.. विश्वास आम्ही नेमका कोणावर ठेवायचा हवामान खात्यावर ठेवायचा की सरकार वर ठेवायचा सरकार म्हणते पीककर्जासाठी एवढं टार्गेट दिलंय .ते नुसतं मंत्रिमंडळात दिलय का...? मग बँकेत गेल्यावर बँक वाले म्हणतात या उद्या या उद्या पाणी प्यायची पंचाईत झाली आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही बी बियाणे वर कुणाचेही नियंत्रण नाही काहीचे काही भाव लावायला लागले आहेत. विक्रम समजना गेलं आहे डिझेल चे भाव वाढल्यामुळे ट्रॅक्टर नांगरटीचे भाव वाढले आहेत मिळत नाही त्यामुळे आम्ही हवालदिल झालो आहोत आता आम्हालाच नेमकं समजत नाही की आम्ही आता करावं काय...? असं प्रल्हाद चित्रे म्हणाले.




 


आपल्याला हवामान विभागाने 7 ते 10 जून या कालावधीमध्ये पाऊस येईल असं सांगितलं होतं .आजपर्यंत आपल्याला पाऊस झालेला नाही हे मात्र खरं आहे साधारण आपल्याकडे दहा जूनच्या नंतरच पावसाला सुरुवात होते. 15 जून च्या नंतर संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस पडतो शेतकऱ्यांनी अपेक्षा केली आहे. बियाणे खरेदी करण्याची एकच झुंबड उडाली होतीमात्र आता पाऊस न आल्याने शेतकरी आता थोडा शांत झाला आहे शेतकऱ्यांना असे आवाहन करत आहे की 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. साधारण सहा इंच खोलीची ओल झाल्यानंतरच शेतकर्‍यांनी पेरणी करावी फार लवकर पेरणी करू नये असं आमचं सांगनं आहे. पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे त्यामुळे कोणीही गर्दी करु नये. विशिष्ट वाणाचा किंवा विशिष्ट जातीचा आग्रह शेतकऱ्यांनी धरू नये. शेतकऱ्यांनी खताच्या बाबतीतही मिश्रखतांचा वापर करावा. विविध खते बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ती खरेदी करावीत व शेतकऱ्यांनी योग्य पाऊस पडल्या नंतर पेरणी करावी असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक बाबासाहेब जेजुरकर यांनी केलं आहे.


Tags:    

Similar News