परीक्षा निकाल प्रक्रियेत पुणे विद्यापीठाचा सावळागोंधळ!
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणपध्दती राज्यभर अवलंबली गेली होती. परंतू पुण्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्य़ा म्हणण्यानुसार पुणे विद्यापिठाने या कोरोना काळातील स्वतःचेच आदेश पाळले नाहीत. असा आरोपच या विद्यार्थ्यांनी केला आहे. नेमकं त्यांच म्हणणं काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...;
कोरोना काळात सगळ्याच गोष्टी बिघडल्या होत्या. मागील अडीच ते तीन वर्षांसाठी पुन्हा नव्याने आपल्याला घडी बसवावी लागली. त्याच अंतर्गत शिक्षण व्यवस्थेमध्येही काही तात्पुरते बदल करम्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया पार पडली होती.
यादरम्यान ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे पुणे विद्यापीठाच्या head of Council कडून विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केलं जाईल अशा पद्धतीचा आदेश काढण्यात आला होता. पण संबंधित आदेशाचं विद्यापीठाने पालन केलं नसल्याचा आरोप आता विद्यार्थी स्तरातून केला जात आहे.
आम्ही यासंदर्भात महाविद्यालयाला विचारला असता हा आमचा विषय नसून विद्यापीठाचा विषय आहे असं उत्तर महाविद्यालया कडून देण्यात आल्याचं विद्यार्थी सांगत आहेत. यावर आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी विद्यापीठाचे अधिकारी महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या विषयी प्रतिक्रीया विचारली. त्यावर विद्यापीठाने संबंधित आदेशाचे पालन केले आहे, विद्यार्थी आरोप का करत आहेत याची कल्पना नाही अशी प्रतिक्रिया विद्यापिठाचे अधिकारी महेश काकडे यांनी दिली आहे.
या संपुर्ण प्रकरणात पुण्यातील झील इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी केलेली बातचित पहाच...