मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर केली. मात्र अधिकाऱ्यांच्या दफ्तरदिरंगाईचा थेट शेतकऱ्यांना फटका बसत आहे. याचाच वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा स्पेशल रिपोर्ट
राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain) शेतकऱ्यांची पीकं पाण्यात गेले. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने साडे चार हजार कोटी रुपये नुकसान भरपाईची मदत जाहीर केली. तसेच तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले. मात्र रायगड (Raigad) जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी पंचनामे केले नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. याच रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सगळं पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांसमोर पोटाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत वाटप केली आहे. मात्र ऑक्टोबरमध्ये भात कापणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे व परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु आहेत. हे पंचनामे पुर्ण होताच अहवाल नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठवला जाईल. यानंतर शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळेल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बानखले यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात भात लागवडी खालील एकूण क्षेत्र व एकूण पेरणी क्षेत्र (हेक्टर)
तालुका अलिबाग: एकूण पिकाखालील क्षेत्र- 13603 ,
एकूण पेरणी क्षेत्र:-13072
तालुका मुरुड:एकूण पिकाखालील क्षेत्र- 3371 ,
एकूण पेरणी क्षेत्र:-3226
तालुका: पेण:एकूण पिकाखालील क्षेत्र- 12578,
एकूण पेरणी क्षेत्र:-11733
तालुका: खालापूर: एकूण पिकाखालील क्षेत्र- 3011.८
एकूण पेरणी क्षेत्र:-2931
तालुका :पनवेल: एकूण पिकाखालील क्षेत्र- 9285.९
एकूण पेरणी क्षेत्र:-8268.9
तालुका: कर्जत: एकूण पिकाखालील क्षेत्र- 9999.७
एकूण पेरणी क्षेत्र:-9257.6
तालुका: उरण: एकूण पिकाखालील क्षेत्र- 2600.८
एकूण पेरणी क्षेत्र:-2466.9
तालुका: माणगाव: एकूण पिकाखालील क्षेत्र- १३४९२
एकूण पेरणी क्षेत्र:-12491
तालुका: तळा: एकूण पिकाखालील क्षेत्र- २६१५
एकूण पेरणी क्षेत्र:-2291
तालुका: रोहा: एकूण पिकाखालील क्षेत्र- १०५३०
एकूण पेरणी क्षेत्र:-10489
तालुका:सुधागड : एकूण पिकाखालील क्षेत्र- 4890.५
एकूण पेरणी क्षेत्र:-4952.8
तालुका:महाड : एकूण पिकाखालील क्षेत्र- १२५२४
एकूण पेरणी क्षेत्र:-12107
तालुका:पोलादपूर : एकूण पिकाखालील क्षेत्र- 3966.९
एकूण पेरणी क्षेत्र:-3816.5
तालुका:म्हसळा : एकूण पिकाखालील क्षेत्र- 2632
एकूण पेरणी क्षेत्र:-2597
तालुका:श्रीवर्धन : एकूण पिकाखालील क्षेत्र- 1503.३
एकूण पेरणी क्षेत्र:-1487.5
एकूण पिकाखालील क्षेत्र:- 106605
एकूण पेरणी क्षेत्र:- 101187
रायगड जिल्ह्यात ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र 224.46 हेक्टर इतके आहे. तसेच जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 1 हजार 508 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. याबरोबरच परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून ते पुर्ण झाल्यानंतर शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कृषी कार्यालयातून मॅक्स महाराष्ट्रला मिळाली आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरकारने मदत जाहीर केली. मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे त्याचा थेट फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करा आणि आम्हाला मदत द्या, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.