सोलापूर : चंद्रभागा नदीत विर धरण आणि उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठचे जनजीवन विस्कळित झाले आहे. या नदीवर असलेले अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून पंढरपूरमधील चंद्रभागा नदी पात्रात असलेली मंदिरे अर्धी पाण्याखाली गेली आहेत. तर पुरांमुळे छोटे व्यावसायिक आणि नदीत होडी चालवणाऱ्या होडी चालकांच्या रोजी रोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत बचाव पथकाची एक टीम दाखल झाली असून नदीतील घाटांवर बरिकेड्स टाकून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...