ग्रामीण भागात नशेसाठी झोपेच्या गोळ्या आणि कोडीन युक्त औषधींचा वापर..
बीड सारख्या ग्रामीण जिल्ह्यात नशेसाठी झोपेच्या गोळ्या आणि कोडीन युक्त औषधींचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या नशेच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात तरुण पिढी भरकटत असल्याने समाजासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या विषयीचा मॅक्स महाराष्ट्राचा एक स्पेशल रिपोर्ट...;
बीड शहरातील मध्यवर्ती कारंजा भागातील न्यु विहान मेडिकलमध्ये Alprozalam हा घटक असलेल्या अल्पेक्स- 0.25 अल्प्राक्स. 0.5 या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 1500 हजार गोळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेषतः या गोळ्याची गरजे पेक्षाजास्त प्रमाणात दिसून आल्या तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या आजारांसाठी या गोळ्या देता येत नसताना मेडिकल चालकाने या गोळ्याची मागे त्याला सर्रास विक्री केल्याच देखील निदर्शनास आला आहे.या नंतर शिरूर कासार मधील खासगी डॉक्टर कडे देखील हा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला.या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..या नंतर ग्रामीण भागात नशेसाठी वापरली जाणारी साधन बदलली आहेत त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
आता पर्यंत दारूच्या व्यसनाने घरदार उध्वस्त झालेले आपण पाहिले असतील मात्र बीड मध्ये दारू सोबतच नशेसाठी वापरल्या जणाऱ्या पदार्थाची नावे ऐकल्यावर पाया खालची वाळू सरकेल.. झोपेच्या आजारासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, कोडीन युक्त सिरप, नाकाने नशा करण्यासाठी व्हाईटनर,पेट्रोल,चिटकवण्यासाठी वापरले जाणारे (फेव्हीकॉल, स्टिकपास्ट,सुलोचन) याचा देखील नशा करण्यासाठी वापर केला जात असल्याचे व्यसनमुक्तीसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सांगतात.. बीड शहरांमधील जागोजागी च्या कचराकुंडी मध्ये जाऊन पाहिलं तर कोडीन युक्त सिरप च्या बाटल्यां पाहायला मिळतील असं सामाजिक कार्यकर्ते रिजवान शेख यांनी सांगितलं..
शाळकरी मुलापासून ते तरुणाईपर्यंत व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे पूर्वी फक्त दारूच व्यसन असायचं मात्र आता,गोळ्या आणि नवीन नशेच्या साधनांची यादी ऐकून भीती वाटायला लागली आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन या अगोदर बीड शहरात पाच ते सहा खून झाले आहेत माझ्या ऑफिस समोर देखील लहान मुलं नशा करताना मी पाहिले आहेत अस बीड चे सामान्य नागरिक शाफिक शेख यांनी सांगितलं..
-बीड जिल्हा रुग्णालयात प्रत्येक महिन्याला 25 ते 30 रुग्ण नव्या व्यसनाच्या आहारी गेलेले उपचारासाठी येत आहेत. त्यामधे झोपेच्या गोळ्या,ओपॅड ग्रुप, वास घेऊन नशा करणारे रुग्ण येत आहेत.ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.जास्त दिवस जर नशा केली तर सेरेब्रल एट्रोफी हा मेंदूचा गंभीर आजार होऊ शकतो .स्वभावात काही कायम स्वरूपी बदल होतात,रागीट स्वभाव,मनासारखे झाले न्हाई तर मारहाण करणे तोडफोड करतो.. या साठी पालकांनी काळजी घ्यावी.. आपल्या व असे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेची संपर्क साधावा असं डॉ. मुजाहेद यांनी सांगितलं
डॉ. मुजाहिद शेख यांच्या व्यसनमुक्ती केंद्रात तब्बल 16 व्यसनाच्या आहारी गेलेले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यात वेगवेगळ्या नशेच्या पदार्थाचे व्यसनाने बाधीत रुग्ण आहेत. या पैकी मोमीन शोएब या 23वर्षीय रुग्णास विचारले असता माझ्या घरगुती कारणामुळे मी दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलो दारु घेतली नाहि तर झोप लागत नसल्यामुळे मी झोपेच्या गोळ्या घ्यायचो आणि त्याच व्यसन लागलं... आता पश्चाताप होतोय असा रुग्णाने सांगितलं.
बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विहान मेडिकल स्टोअर यांच्या विरोधात अवैधरित्या म्हशीच्या गोळ्यांची विक्री करण्याच्या कारनावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे..त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. मात्र मोठ्या प्रमाणात बीड शहरामध्ये अशा गोळ्यांची विक्री होत असल्याचा आम्ही छापे टाकून उघडकीस आणला आहे तसेच यामधून गँभीर गुन्हे घडले आहेत. पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असं बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितलं.
या संदर्भात औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राजगोपाल बजाज यांना विचारलं असता.. न्यू विहान मेडिकल आणि डॉ.वडजाते यांच्याकडे मागणी पेक्षा जास्त अलप्राझोलॅम गोळ्या आढळून आल्या त्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय देता येत नाहीत मात्र या दोन्ही ठिकाणी या गोळ्यांचे सर्रास विक्री सुरू होते असे देखील निदर्शनास आले त्यावरून दुकान मालक शेख सईद शेख मजहर व फार्मासिस्ट सारंग घोंगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर ठिकाणी अशी विक्री सुरू आहे का या संदर्भात तपासणी केली जाईल तसेच या दोन्ही जनाच्या औषध परवाने रद्द करण्यासंदर्भात देखील प्रक्रिया सुरू आहे असं सांगितलं.
एकंदरीतच ऊसतोड मजूर आणि मागास असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये नव्या व्यसनांच्या आहारी गेल्याने अनेक तरुणांई चे जीवन उध्वस्त होत आहे. तर काहींना गंभीर आजार जडलेला आहे. तर काहींनी नसेच्याभरात गंभीर गुन्हा करून जेलची हवा खात आहे. बदलत्या युगात नशेसाठी वापरली जाणारी साधने देखील बदलले आहेत त्यामुळे मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे..या सामाजिक समस्येकडे शासन प्रशासन गंभिर होवून उपाय शोधणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.