मुंबईत देशातील पहिलं ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र, नागरिकांचा मोठा प्रतिसाद
देशात लसीकरण सुरू झाले असले तरी अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची परवानगी नसली तरी यावर मुंबई महापालिकेने मधला मार्ग काढला आहे.;
कोरोनावरील लसीकरणाची सर्वच जण प्रतीक्षा करत असताना आता मुंबईत एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस घेण्या्साठी सहज, सोपी सुविधा मिळावी म्हणून मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागाने ड्राइव्ह इन लसीकरण सुविधा मंगळवारपासून सुरू केली आहे. कोहिनूर पार्किंग इथे या सुविधेला सुरुवात केली आहे. या उपक्रमाला पहिल्यािच दिवशी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. संध्याकाळपर्यंत एकूण २२७ वाहनांमधून ३६५ नागरिकांना या केंद्रावर लस देण्यात आली.
शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजता या लसीकरण उपक्रमाचा सुरूवात झाली. मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढल्याननंतर दादर परिसरातील कोहिनूर वाहनतळ येथे जी/उत्तसर विभाग कार्यालयाने ड्राइव्हक इन कोविड चाचणी केंद्र सुरु केले होते. या केंद्राच्या माध्यमातून दादरमधील चाचण्यां ना वेग येण्यास मोठी मदत झाली होती. त्याच धर्तीवर ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंध लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेऊन पालिकेने हा उपक्रम प्रत्यक्षात सुरु केला आहे.
कसे होते लसीकरण?
कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी हॉस्पिटल्समध्ये सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना काही वेळ प्रतीक्षा करावे लागते. तसेच लस घेतल्या नंतर त्यांना काही वेळ पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. सध्या घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मुभा सरकारने दिलेली नाही. त्यामुळे यावर मध्यम मार्ग म्हणून, जी/उत्तर विभागाने ड्राइव्ह् इन लसीकरण उपक्रम सुरु केला आहे. यामध्यें ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती थेट वाहनात बसूनच लसीकरण केंद्रामध्ये येतात व लस घेतात.
गाडीत बसूनच नागरिकांना लस
कोहिनूर वाहनतळावर एकूण दोन बूथ नेमण्यात आले आहेत. तेथे लस घेण्यासाठी येणाऱ्या पात्र नागरिकांनी नोंदणी केली नसेल तर वाहनात बसूनच त्यांना नोंदणी देखील करता येते. त्यानंतर त्यांना लस दिली जाते. तसेच गाडीत थांबूनच त्यांना निरीक्षणाचा कालावधी पूर्ण करता येतो. लस घेण्यासाठी बूथपासून किमान ५० वाहने एकाचवेळी रांगेत थांबू शकतील आणि निरीक्षण कालावधी पूर्ण करेपर्यंत किमान १०० वाहने एकाचवेळी थांबू शकतील इतकी जागा याठिकाणी उपलब्ध करुन देण्याेत आली आहे. निरीक्षण कालावधी दरम्यान काही त्रास वाटला तर संबंधित नागरिक हॉर्न वाजवून इशारा करु शकतात. तसेच वाहनांमध्ये. थांबूनच, लस घेवून ये-जा होत असल्याने प्रत्यक्ष जागेवर व्यक्तींची वर्दळ होत नाही, परिणामी संसर्गाचा धोका नाहीसा होतो, हे या ड्राइव्हह इन लसीकरणाचे फायदे आहेत.
कोहिनूर वाहनतळावरील ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रावर दोन सत्रांमध्ये मिळून एकूण ८ डॉक्टर, ७० वॉर्ड बॉय, १८ नर्स नेमण्यात आल्या आहेत. लससाठा पुरेसा उपलब्ध असेल तर दिवसभरात एकूण ५ हजार नागरिकांना लसीकरण करण्याची क्षमता या केंद्रामध्ये आहे, अशी माहिती सहायक आयुक्त दिघावकर यांनी दिली आहे.