मुंबई पोलिसांच्या सिव्हील ड्युटीसाठी ड्रेसकोड पण भगव्या कपड्यांना बंदी?

मुंबईत पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी सिव्हील ड्रेसमध्ये ड्युटी करावी लागते. पण आता या पोलिसांसाठी एक ड्रेसकोड ठरवला गेला आहे. पण त्यात भगव्या रंगाचे कपडे परिधान करण्यास मनाई करण्यात आल्याची चर्चा आहे. वाचा रेनी अब्राहम यांचा Exclusive रिपोर्ट.....

Update: 2020-11-17 10:40 GMT

मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सिव्हील ड्रेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याने सध्या मुंबई पोलिसांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतल्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये सध्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी यासंदर्भात सर्व पोलिसांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये दिवसभर चर्चा सुरू होती.

एका पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर माहिती दिली की, "दोन दिवसांपूर्वी सहआयुक्तांनी सेना भवन परिसरात ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने भगवा शर्ट आणि जीन्स परिधान केली असल्याने त्याला फटकारले होते. त्यानंतर सहआयुक्तांनी जीन्स शर्ट या पेहरावाला बंदी घालण्याच्या सूचना दिल्या, तसंच सिव्हील ड्रेसमध्ये ड्युटी करणाऱ्या पोलिसांनी यापुढे पांढरा शर्ट आणि ट्राऊझरच परिधान करावी असे सांगितले. इन्फार्मल (लाल रंग) पोषाखावर बंदी घालण्यात आली आहे."

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "सिव्हील ड्रेसमध्ये असलेल्या पोलिसांनी योग्य पोषाख परिधान करावे असे सांगितले आहे. मी सावरकर भवन कॉम्प्लेक्समध्ये त्या दिवशी गेलो होतो. तिथे काही पोलीस कर्मचारी सिव्हील ड्रेसमध्ये आणि पायात स्लीपर घातलेले मला दिसले. या पोलिसांवर दहशतवाद किंवा माफियांच्या कृत्यांशी संबंधित कामांची जबाबदारी आहे, त्यांनी आणखी व्यवस्थित असण्याची गरज आहे. उलट त्यांची ओळख उघड होऊ नये यासाठी दाढी वाढवली तर ते त्या वातावरणाशी निर्भयपणे जुळवून घेतात, असेही आम्ही त्यांना सांगतो." याचबरोबर विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, "सावरकर भवनसारख्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या सिव्हील ड्रेसमधील पोलिसांसाठी ड्रेसकोडच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा ठिकाणी सिव्हील ड्रेसमधील पोलीस चटकन ओळखता यावेत, यासाठी त्यांचा पोषाख व्यवस्थित असणे गरजेचे आहे. ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांच्या प्रतिमेला स्लीपर किंवा कॅज्युअल कपडे शोभत नाहीत. त्यामुळे श्री. कोळे यांना आपण योग्य ती पावलं उचलण्यास सांगितले होते. पण पांढरा शर्ट आणि फॉर्मल ट्राऊझर बंधनकारक केलेली नाही" असे विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ऑनड्युटी पोलिसांची कर्तव्ये आणि बंदोबस्तावरील पोलिसांची कर्तव्ये यामध्ये फरक आहे.

पण त्यांनीही असेही स्पष्ट केले की त्यांच्या सूचनांचा काही विभागप्रमुखांनी चुकीचा अर्थ काढला असेल. त्यामुळे त्यांनी विशिष्ट रंगाचे कपडे (फॉर्मल पांढरा शर्ट आणि ट्राऊझर) बंधनकारक असल्याचा समज करुन घेतला.

पण ज्या पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर वरील माहिती दिली होती, त्यांनी असेही सांगितले की सावरकर भवन इथे ड्युटीवर असलेल्या पोलिसाला भगव्या रंगाच्या शर्ट परिधान केल्यामुळेच पाटील यांनी फटकारले होते. पण तिकडे मुंबईतील विविध पोलीस स्टेशन्समध्ये आता सिव्हील ड्रेस कोडवरुन मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मते सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये मिसळून राहण्यासाठी त्यांना कॅज्युअल ड्रेस कोड सोयीचा वाटतो. "जर गर्दीच्या ठिकाणी पोलिसांच्या पोषाखाऐवजी सिव्हील ड्रेस कोडमध्ये उभे रहायचे असते. तिथे जर युनिफॉर्म आला तर मग पोलीस युनिफॉर्मशिवाय दुसरे कपडे घालण्याचा उपयोग काय?" असा सवाल काही पोलीस कर्मचारी उपस्थित करत आ

Tags:    

Similar News