कुबेराच्या वस्तीतलं हे गुपित तुम्हाला माहितीय का ?

Update: 2023-07-31 09:29 GMT

दक्षिण मुंबई.. इथं देशातील सर्वांत महागडी जागा, घरं याच भागात आहेत. देशाची आर्थिक राजधानी. दक्षिण मुंबईत जितका पैसा खेळतो तितका अनेक राज्यांचं बजेटही नाही असं सांगितलं जातं. दक्षिण मुंबईला कुबेराची वस्ती असं ही म्हटलं जातं. मात्र, ही कुबेराची वस्ती सतत घाबरलेली असते. अस्थिर असते. आज आम्ही तुम्हाला या घाबरलेल्या कुबेराच्या वस्तीचं सिक्रेट सांगणार आहोत.

Full View

कुलाबा ते माहीम म्हणजे दक्षिण मुंबई. पण या दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट आणि मलबार हिल म्हणजे कुबेराच्या वस्तीचा कळस. या भागात तुम्हाला अनेक टोलेजंग इमारती दिसतील. पण या इमारतींमध्ये एक गुपित आहे... या कुबेराच्या वस्तीतील अंधश्रद्धांमुळे तुम्हाला नरिमन पॉइंट, मलबार हिल, कफ परेड भागातील अनेक इमारती, हॉटेल्स मध्ये १३ वा मजलाच सापडणार नाही.

काय आहे या भागातील १३ व्या मजल्यांचं गुपित.. का गुप्त आहेत १३ वे मजले. १२ व्या मजल्यानंतर थेट १४ वा मजला कसा येतो? १३ वा मजला गेला कुठे... अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सापडणार नाहीत.

इथले ट्रायडन्ड हॉटेल, मित्तल टॉवर्स अशा अनेक इमारतींमध्ये १३ वा मजलाच नाही. १३ वा नंबर अशुभ असल्याने या इमारतींमध्ये मजल्यांना नंबर देताना १३ आकडा गाळण्यात आला. १३ व्या मजल्याला ही कुबेराची वस्ती इतकी का घाबरलेली असते. तर १३ हा आकडा अशुभ असल्याचे अनेक पंडित सांगतात आणि त्यामुळे आपल्या घराला किंवा कार्यालयाला १३ आकडा असू नये अशी अनेकांची मागणी असते.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या राजधानीत वर्षानुवर्षे सुरू असलेली ही श्रीमंताची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आजवर कोणी प्रयत्न केले नाहीत. सरकार या विषयाला हात घालून कुबेराच्या वस्तीची या भीतीतून सुटका करेल का ?

Tags:    

Similar News