विविध मागण्यांसाठी कडाडली दिव्यांगांची हलगी

दिव्यांगांचा 5 टक्के निधी तातडीने खर्च करावा, यासह विविध मागण्यांसाठी सोलापूरमध्ये दिव्यांगांनी हलगी मोर्चाचे आयोजन केले होते.;

Update: 2022-10-11 10:39 GMT

महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांचा सर्व्हे करून प्रधानमंत्री आवास योजना किंवा इतर योजनेतून घरकुल मंजूर करावे, या मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीने सोलापूर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दिव्यांगांचा नोकर भरतीतील रिक्त अनुशेष तात्काळ भरावा, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या सोलापूर शाखेला शहराच्या मध्यवर्ती भागात कार्यालयासाठी गाळा उपलब्ध करून द्यावा, यासह महापालिकेकडे असलेल्या स्थानिक विकास निधीतील 5 टक्के निधी पूर्वलक्षी प्रभावाने तात्काळ खर्च करावा.

याबरोबरच महापालिकेच्या मालमत्ता करातून 50 टक्के मिळणारी सवलत विनाअट लागू करावी. दिव्यांगांना दिला जाणारा निर्वाह भत्ता हा नियमीत द्यावा, महापालिकेच्या हद्दीतील मोकळ्या जागा, स्टॉल व गाळे अंध-अपंगांकरिता सरकारच्या निर्देशानुसार 200 चौरस फूट राखीव ठेऊन व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावा.

तसेच महापालिका अस्थापनांवरील दिव्यांग अनुशेषातील पदोन्नतीबाबत तातडीने कार्यवाही करावी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वाहन भत्ता लागू करावा, दिव्यांगांना सहाय्यभूत उपकरणे द्यावीत, तसेच इतर योजनांमधून घरकूल मंजूर करावे, अशा विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी महापालिकेवर हलगी मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी या सर्व मागण्यांसाठी कालबध्द कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी दिव्यांगांनी केली.


Full View

Tags:    

Similar News