शेतीच्या मागणी पुरवठ्याचं गणित सोडवणारं सॉफ्टवेअर
शेतकऱ्यांच्या शेती मालाला आधारभूत किंमत मिळावी आणि त्यांना नफा मिळावा यासाठी विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती झाली असून या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंट मिळालं आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....
ती मालाला हमी भाव देण्यात यावा.अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहे.पण त्याचे कायद्यात रूपांतर होताना दिसत नाही.हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेती माल कवडीमोल किंमतीला विकावा लागतो.अशी भावना शेतकऱ्यांची आहे.मागील काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता.कांदा या पिकाची ही अशीच अवस्था काही दिवसांपूर्वी झाली होती.त्यावर केलेला खर्च ही निघाला नव्हता.या शेती पिकांचे भाव अचानक वाढतात तर अचानक कमी होतात.
त्याचा परिणाम शेती माल उत्पादक शेतकऱ्यांवर होत असल्याचे दिसून येते.शेती मालाला भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी झाल्याने काही शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे.या सर्व त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस व अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी शेतकऱ्यांच्या शेती मालाला आधारभूत किंमत मिळावी आणि त्यांना नफा मिळावा, यासाठी विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती केली असून त्याला भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.
'ऍन इंटिलीजेंट सिस्टीम अँड ए मेथड फॉर सिस्टिमेटिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ अग्रिकल्चर गुड्स' असे या सॉफ्टवेअरचे नाव आहे.ऍन इंटिलीजेंट सिस्टीम अँड ए मेथड फॉर सिस्टिमेटिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ अग्रिकल्चर गुड्स' असे या सॉफ्टवेअरचे नाव असून त्याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट प्राप्त झाले आहे.शेतीमालाच्या तसेच विविध कृषी वस्तूंच्या किंमत निर्धारणसंबंधी आणि वितरणासंबंधी हे सॉफ्टवेअर उपयोगी ठरणार आहे. कोणत्या वेळी कोणते पीक घ्यावे,त्याचबरोबर विविध शेती मालाला कोणत्या कालावधीमध्ये भाव प्राप्त होतो.तसेच कोणत्या विभागांमध्ये त्या पिकाला दर मिळतो हे विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर दाखवते.त्यामुळे हे सॉफ्टवेअर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
विभागनिहाय बाजारमूल्यची माहिती या सॉफ्टवेअर मधून मिळणार
या विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विभागनिहाय बाजारमूल्यची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच त्या माध्यमातून जिल्हानिहाय विक्री व वितरण व्यवस्था देखील या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून योग्य पद्धतीने करता येणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळून त्यांचा उत्पन्न वाढण्यासाठी या विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे.त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
सॉफ्टवेअरचा शेतकऱ्यांना व शासनाला फायदा
विद्यापीठाकडून शेतीमालाच्या किफायतशीर किमतीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचा शेतकऱ्यांना व शासनाला फायदा होण्यासाठी एक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार येणार असल्याचे अर्थशास्त्र विभागाचे डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी सांगितले.
सॉफ्टवेअर शेतकऱ्यांना फायदेशीर कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, नुकतेच आमच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.हे संशोधन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.शेती मालाच्या आधारभूत किंमती फक्त कागदोपत्री राहतात.शेती मालापासून शेतकऱ्यांना जो नफा मिळातो तो मिळत नसल्याचे दिसते.शेती मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती कसण्यास उत्साह राहत नाही.त्यामुळे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाने संशोधन करून सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी शेती मालाला चांगला भाव आहे व मागणी आहे याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.शेतकऱ्यांना शेती मालाची वेगवेगळ्या विभागातील माहिती मिळण्यास आतापर्यंत अडचण होती.ती दूर होण्यास या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मदत होईल.या सॉफ्टवेअरमुळे साधारण शिक्षण घेतलेल्या शेतकऱ्याला वितरण आणि विक्री याची माहिती मिळणार आहे.शासनाकडे या सॉफ्टवेअरचे सादरीकरण केले जाणार आहे.
कृषी क्षेत्रावर 70 टक्के जनता अवलंबून असल्याने शेतकऱ्यांसाठी हे सॉफ्टवेअर अत्यंत महत्त्वाचे
डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,कृषी क्षेत्रातील कामाबद्दल भारत सरकारकडून पेटंट मिळाले आहे.कृषी क्षेत्राचा विचार केल्यास या क्षेत्रावर 70 जनता अवलंबून आहे.यावर्षीचा या क्षेत्राचा जीडीपी मधील सहभाग बघितल्यास तो जवळपास 16 टक्के आहे.या क्षेत्रावर अवलंबून असणारे लोक जास्त प्रमाणात आहेत. परंतु मिळणारे उत्पन्न कमी आहे.त्यासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत.त्याच्यामध्ये सर्वात परिणामकारक घटक म्हणजे किंमत होय.ती बऱ्याच अंशी काही वेळेस खर्चापेक्षा जास्त तर काही वेळेस खर्चापेक्षा कमी असते.त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा नुकसान सोसावे लागते.याच्यावर तोडगा म्हणून भारत सरकार फार पूर्वीपासून 23 शेती मालाला किमान आधारभूत किंमत देत आहे.भारत वेगवेगळ्या हवामान विभागात विभागला गेला आहे.म्हणजे पंजाब मध्ये जे वातावरण आहे,ते गहू आणि काडीच्या वाढीसाठी खूपच चांगले आहे.महाराष्ट्रात पाहिले तर ज्वारी,बाजरी यांच्यासाठी हवामान चांगले आहे.23 आधारभूत किंमत असलेल्या पिकांच्या व्यतिरिक्त शेतकरी अनेक पिके घेत असतात.त्या मालाला कोणत्याही प्रकारची आधारभूत किंमत नाही.
किफायतशीर किंमत या सॉफ्टवेअर मध्ये मोजली जाते
पिकांची विस्तृत माहिती व त्यांच्या किंमतीचा अभ्यास करून किफायतशीर किंमत या सॉफ्टवेअर मध्ये मोजली जाते. एखाद्या मार्केटमध्ये त्या मालाला किती किंमत आहे याची माहिती सॉफ्टवेअर मध्ये नोंदवली जाते व त्याची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचवली जाते.वितरण व्यवस्थेची माहीती शेतकऱ्यांना मिळणार आहे.एपीएमसी सोबत हे सॉफ्टवेअर काम करत असून शेतकऱ्यांना शेती मालाला चांगली किंमत मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विभागातील शेती मालाच्या किंमतीची माहिती या सॉफ्टवेअर मधून मिळणार शेती मालाच्या किंमतीचा प्रश्न सातत्याने चर्चिला जातो.पण त्यावर ठोस असा निर्णय आजपर्यंत झाला नाही.गेल्या अनेक वर्षांपासून शेती मालाला हमी भाव देण्यात यावा,यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन,मोर्चे निघत आहेत.पण त्याला मूर्त स्वरूप येईना गेले आहे.त्यातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.प्रकाश व्हनखडे यांनी शेती मालाला आधारभूत किंमत मिळावी,यासाठी केलेल्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी,यासाठी सोफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.त्यामुळे या संशोधनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.हे संशोधन सरकारकडे सादर केले जाणार असून शासन याच्यावर काय निर्णय घेईल याकडे विद्यापीठा सह शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.या सोफ्टवेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विभागातील शेती मालाच्या किंमतीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
जो वस्तू तयार करतो त्यांना किंमत ठरवण्याचा अधिकार पण शेतकऱ्यांना का नाही ?
जो वस्तू तयार करतो त्याची किंमत ठरवण्याचा त्या कंपनी किंवा मालकाला असतो.परंतु शेती मालाच्या बाबतीत उलट आहे. हा मध्यस्थीच्या माध्यमातून विकला जात असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो अशी काही शेतकऱ्यांची भावना आहे.जो वस्तू तयार करतो,त्याला किंमत ठरवण्याचा अधिकार आहे असे शेतकऱ्यांना वाटते. मग तो अधिकार शेतकऱ्यांना का नाही असा प्रश्न अनेक शेतकरी विचारत आहेत.
सॉफ्टवेअरचा शेतकऱ्यांना होणार फायदा
बाजारात कोणत्या विभागात कोणत्या शेती पिकाला मागणी आहे किंवा एखाद्या विभागात त्या वस्तूला किती किंमत चालू आहे.याची माहिती या सॉफ्टवेअर मधून शेतकऱ्यांना मिळणार आहे.शेतकऱ्यांना दररोज माहिती मिळाल्याने त्यांना जेथे जास्त किंमत आहे,तेथे माल पाठवता येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणण्यासाठी हे सॉफ्टवेअर महत्वाचे ठरेल असे अनेकांना वाटते.