कोरोनाचा परिणाम सेवाग्रामवरही, आश्रमातील 50 लोकांचा रोजगार गेला...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने नावारुपाला आलेल्या सेवाग्राम आश्रमला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आश्रमातील 50 लोकांचा रोजगार गेला असून आश्रमातील अनेक उपक्रम बंद पडले आहे. नक्की काय परिस्थिती आहे आश्रमाची? वाचा: कोरोना काळातील सेवाग्राम;
महात्मा गांधीजींच्या नावाशिवाय सेवाग्राम पूर्ण नाही होऊ शकत नाही. वयाच्या 67 व्या वर्षी म्ह्णजेच 30 एप्रिल 1936 च्या पहाटे महात्मा गांधी वर्ध्या पासून आठ किलोमीटर अंतरावरील सध्याच्या सेवाग्राम या ठिकाणी पोहोचले. पाच ते सहा दिवस ते याठिकाणी राहिले. त्या्नंतर सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचे केंद्र बनले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील या ठिकाणी लोकांचा राबता थांबला नाही. मात्र, कोरोना काळात हा राबता थांबला.
सुमारे ३०० एकर जमिनीवर हा आश्रम वसलेला आहे. सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आहेत. त्यात स्वत: गांधी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते. त्यात गांधींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते. तेथे असणारी बापू कुटी आणि बा कुटी प्रसिद्ध आहेत. सेवाग्राम येथे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक भेट द्यायला येतात. सेवाग्रामचे पहिले नाव सेगाव होते, पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असे केले.
जागतीक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेले सेवाग्राम गेल्या वर्षभरापासून देशभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाने बंद आहे. महात्मा गांधीजींचा वारसा लाभलेल्या बापू कुटी या जागतिक पर्यटक स्थळावर सुद्धा कोरोचा मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरापासून हे स्थळ पूर्णपणे लॉक करण्यात आला.
काय आहे 'बापू' कुटी आणि 'बा' कुटी
गांधीजींनी त्यांच्या वास्तव्यासाठी उभारण्यात येणा-या कुटीकरीता 500 रुपयांहून अधिक खर्च लागणार नाही. ही अट घालून कुटी उभारण्यासाठी परवानगी दिली. या कुटीलाच आदि निवास म्हणून ओळखले जाते. या कुटीमध्ये महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधी, सरहद्द गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राहायचे. याच कुटीतून पुढे महात्मा गांधी बापू कुटीत राहायला गेले.
आदि निवासात गावक-यांची संख्या. दिवसेंदिवस अधिक वाढल्याने गांधीजींच्या अनुयायी मीरा बेन यांनी त्यांच्या कुटीच्या पूर्वेला अजून एक नवीन कुटीची निर्मिती केली. ही कुटीही गांधीजींच्या कार्यालयाकरीता देऊन त्यांनी गावाजवळच स्थलांतर केले. या कुटीलाच आज बापू कुटी आणि बापू ऑफिस असे संबोधले जाते.
लॉकडाऊनमध्ये आश्रम बंद असल्याने आश्रमातील इतर उपक्रम देखील बंद आहेत.
१) खादी उद्योग
२) शेती आणि गौशाळा (देसी गाय संगोपन)
३) आहार केंद्र
४) यात्री निवास
आता गेल्या वर्षभरापासून हे उद्योग पूर्णपणे कोलमडले आहे. यापैकी यात्री निवास, शेती आणि गौशाला सोडले तर इतर तीनही उद्योग लॉकडाऊन पासून पूर्णपणे बंद असल्याने आर्थिक बळ शून्य झाला आहे. यामुळे तेथील काम करण्याऱ्या नागरिकांना सुद्धा आता हाताला काम उरलेलं नसल्याने ते घरीच आहेत.
सर्व बापू कुटी सांभाळायला एकूण लॉकडाऊन पूर्वी तब्बल ६५ कामगार होते. मात्र आता लॉकडाऊन मुळे फक्त १५ लोकं संपूर्ण बापूंची कुटी सांभाळत आहेत आणि तेही अत्यावशक वेळेतच. या १५ कामगारांपैकी ७ व्यक्ती शेतकाम, ४ गौशाळा देखभाल आणि इतर ४ कामगार हे बापू कुटी साफसफाई आणि सुतार काम बघतायत.
आता सविस्तर माहिती लॉकडाऊन आधी या उद्योगातून कसा फायदा होत होता आणि आता किती होतो :
१) खादी उद्योग
लॉकडाऊन आधी दिवसाला १०-१५ हजार रुपयांचा व्यवसाय होत होता आणि आता लॉकडाऊन मुळे पूर्णपणे ठप्प आहे.
२) शेती आणि गौशाळा (देसी गाय संगोपन)
आश्रम परिसरात ५० एकर शेती आहे. ज्यात विविध पीक वर्षभरात घेत जातात. जसे की गहू, ज्वारी, तुर, चना, हळद आणि भाजीपाला मात्र, आता लॉकडाऊन मध्ये पूर्ण शेतीत फक्त जनावरांसाठी चाऱ्याचं पीक घेतलं जातं.
एकूण ढोर हे ९० आहेत. ज्या पैकी २६ गायी आहेत आणि सध्या त्यापैकी १२ गाय दूध देत असून इतर गाभण आहे. लॉकडाऊन आधी दूध व्यवसायामधून सुद्धा बरीच आर्थिक मदत व्हायची. मात्र, आता अगदी अर्ध्या किंमतीत दूध हे गावात द्यावे लागते.
३) आहार केंद्र
लॉकडाऊन आधी दिवसाला २०-३० हजार रुपयांचा उलाढाल व्हायची मात्र, आता आहार केंद्र पूर्णपणे बंद आहे.
४) यात्री निवास
इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून किंवा एकादरीतच इतर देशांतून पर्यटन स्थळ बघण्यासाठी जे पर्यटक यायचे त्यांची राहायची सोय यात्री निवास मध्ये व्हायची.
इथे तीन प्रकारचे रूम आहेत :
•एसी रूम
•कुलर रूम
•नॉन एसी नॉन कुलर रूम
अश्यात यात्री निवास मधून एकूण दिवसाला चांगली कमाई व्हायची आणि आर्थिक बळ मिळायचं परंतू आता, यात्री निवास कोरोना रुग्णांच्या विलगिकरण्यासाठी वापरल्या जात आहे. परंतु ही पेड सर्व्हिस आहे आणि रुग्णांना २५ % टक्के सूट दिली जाते.
या मुळेच फक्त यात्री निवास, शेती आणि गौशाळा मधूनच आर्थिक बळ बापू कुटीला आहे.
शेतीचे गो शाळा आणि शेतीचे व्यवस्थापक नामदेव ढोले सांगतात...
शेती मध्ये सध्या पूर्ण चारा लावलेला आहे. जेणेकरून ढोर जनावरांसाठी येत्या काळात चाऱ्यासाठी भटकावे लागू नये. दूध प्रति लिटर ५० रुपये विकल्या जायचं पण आता तेच दूध आम्हाला २५ रुपय लिटर ला विकावे लागते. मात्र, त्यानेच कामगारांची रोज मजुरी निघून जाते.
आश्रम परिसरातील व्यवस्थापक विजय धुमाळ सांगतात
कामगारांच्या हातचं काम गेलं आहे. या संदर्भात धुमाळ सांगतात...
जे लोकं आता बेरोजगार होऊन घरी आहेत. त्यांना काम नाही त्या लोकांनाच प्राधान्य देऊन पुन्हा नव्याने सर्व सुरू होईल. तेव्हा कामावर घेतल्या जाईल. मध्यंतरी काही लोकांना कामावर सुद्धा बोलावले होते. परंतु पुन्हा कडक निर्बंध लागल्याने पुन्हा आम्हाला त्यांना कामावरून काढायला लागले. कारण सध्या उद्योगातून आवक फार कमी झाली आहे.
कशावर झाला परिणाम?
यात्री निवास बंद
यात्रा निवासाचं पेड विलागीकरण कक्षात रुपांतर
वर्ष भरापासून आहार केंद्र बंद
आर्थिक बळ पुरेसं नसल्यानं ५० कामगारांचा रोजगार गेला
बापू कुटी बंद असल्याने गाईड सुद्धा घरीच
सेवाग्रामशी संबंधित इतर संस्था
१) गांधी सेवा संघ, सेवाग्राम
२) सर्वसेवा संघ, महादेवभाई भवन, सेवाग्राम
३) नई तालीम समिती, आश्रम, सेवाग्राम
४) ब्रह्म विद्यामंदिर, पवनार, वर्धा
५) महारोगी सेवा समिती, दत्तपूर, वर्धा
६) ग्रामसेवा मंडळ, गोपुरी, वर्धा
७) मगनसंग्रहालय, वर्धा
८) अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, गोपुरी, वर्धा
९) आचार्यकुल, गोपुरी, वर्धा
१०) खादी मिशन, गोपुरी, वर्धा
११) शिक्षा मंडळ, वर्धा
१२) महिला आश्रम, वर्धा
१३) गांधी ज्ञान मंदिर, वर्धा
१४) श्री लक्ष्मीनारायण देवस्थान वर्धा
१५) गोरस भंडार, मगनवाडी, वर्धा
१६) राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा
१७) लेप्रसी फाऊंडेशन, वर्धा
१८) महात्मा गांधी ग्रामोद्योग संशोधन संस्था (एमगिरी)