उत्पन्नापेक्षा खर्च अधिक, कापूस उत्पादकांची करुण कहानी

असं काय घडलं ज्यामुळे कापूस उत्पादकांना उत्पन्नापेक्षा अधिक खर्च आला? याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा स्पेशल रिपोर्ट....

Update: 2022-11-06 14:30 GMT

बीड जिल्ह्यात सोयाबीनसोबत कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सध्या या कापसाची वेचणी सुरू आहे. पण संपुर्ण शेतात नजर मारली तर दरवर्षी पांढरं शुभ्र दिसणाऱ्या शेतात कापसाला मोजकेच बोंडं असल्याचे दिसत आहे. परतीच्या पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान झाल्याने खायचे वांदे झाले आहेत, अशी भावना गणेश खुटाळे या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

कापसाच्या लागवडीपासून ते वेचणीपर्यंत खर्चच खर्च होतो. गेल्या वर्षी कापसाला 15 हजार रुपयांचा भाव होता. मात्र यंदा सात ते आठ हजार रुपयांवर कापसाचा भाव येऊन ठेपलाय. त्यामुळे आता काय करायचं असा वृध्द सवाल महिला शेतकऱ्याने केला आहे.

एकीकडे अतिवृष्टीमुळे तर दुसरीकडे बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. पण आम्हाला मदत नको कापसाला योग्य बाजारभाव द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. सरकारने शेतकऱ्यांची हाक ऐकून शेतकऱ्याला आधार द्यायला हवा, हिच अपेक्षा व्यक्त शेतकरी असलेल्या गौरी खुटाळे यांनी व्यक्त केली.


Full View

Tags:    

Similar News