उत्तर महाराष्ट्रात पांढरं सोन म्हणून प्रसिद्ध असलेले कापूस पीक पूर्ण खराब झाल्याने शेतकरी बेजार झाला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस ओला झाल्याने खान्देशातील प्रत्येक गावात गल्ली, मोहल्ल्यात , आणि रस्त्यांवर शेतकरी कापूस सुकवतांना दिसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यंदा कापसाला सात ते आठ हजार भाव मिळेल असं वाटत असतांना आता या कापसाला दोन हजारातही कोणी घेत नाही अशी परिस्थिती आहे.
कापूस लागवडीसाठी लावलेला खर्चही निघणार नाही, मात्र तरीही कापूस सुकवण्याची धडपड शेतकरी करत आहेत, असे चित्र कधीही पाहायला मिळालं नाही, सरकारने काही तरी भरपाई द्यावी अशी मागणी मायबाप सरकार कडे शेतकरी करत आहे.
याचा आढावा घेतला आहे आमचे सीनिअर करस्पाँडंट संतोष सोनवणे यांनी