नेते झाले सोशल अलर्ट...

Update: 2021-07-31 02:47 GMT

'दिखता है तो बिकता है' अशी एक जुनी हिंदी म्हण आपण अनकेदा आयकत असतो.सद्या सर्वच क्षेत्रात अशीच गत झाली असल्याने, राजकारण क्षेत्र तरी कसे मागे राहणार. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून भक्कम पैसे देऊन पीआर कंपन्यांना काम दिले जाते, जेणेकरून आपल्या कामांचा मार्केटिंग व्हायला पाहिजे. नेत्यांच्या प्रत्येक क्षण कॅमरेत कैद केलं जातं आणि त्यातून टीआरपी वाला भाग सोशल मिडियावर व्हायरल केलं जाते. हे आता प्रत्येक पक्षात झाले आहे. पण कोल्हापूर दौऱ्यावर असेलल्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या एका फोटोने ही चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पावसाने घातलेल्या थैमान आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहे. यावेळी ते लोकांच्या भेट घेऊन त्याचं सात्वन करतायत, मदतीच आश्वासन देतायत आणि परिस्थितीचा आढावा सुद्धा घेत आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात त्यांची सोशल मिडियाची टीम सुद्धा सतत सोबत असते. त्यांनी घेतलेल्या भेटीगाठी काही क्षणात त्यांच्या सोशल अकाऊंटवर अपलोड सुद्धा केले जातात.

पण याचवेळी फडणवीस आपल्या ऑनएअर वावराबाबत किती सजग असतात हे सुद्धा समोर आले आहे. त्याच कारण म्हणजे आपल्या दौऱ्यात कॅमरेत शूट होणाऱ्या व्हिडिओला आवाजाची अडचण होऊ नयेत, म्हणून ते आपल्या जॅकेट ला सतत कॉर्डलेस माइक लाऊन ठेवतात असे, त्यांच्या ट्वीटर अकाऊंट वर पोस्ट झालेल्या फोटोवरून पाहायला मिळत आहे.

फडणवीस यांनी आज कोल्हापूर दौऱ्यात नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची भेटी घेतल्या त्यावेळी सुद्धा जॅकेट ला सतत कॉर्डलेस माइक होता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी सुद्धा माइक होता. तसेच इतर ठिकाणी त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणी सुद्धा जॅकेट ला सतत कॉर्डलेस माइक होताच. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आपल्या ऑनएअर वावराबाबत कसे सजग असतात हे पाहायला मिळाले तर इतर नेत्यांमध्ये मात्र अशी सजगता पाहायला मिळत नाही.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुद्धा सोशल मिडियाची टीम असतेच. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दौरा झाला यावेळी त्यांनी प्रवीण दरेकरांना बोलताना 'ए तू गप्प बस मध्ये बोलू नको' वगळता इतर चर्चांचा फारसा आवाज ऐकू आला नव्हता.तसेच त्यांच्या अनेक व्हिडिओत लोकांशी केलेल्या चर्चेचा आवाज एकू आला नव्हता. पण फडणवीस हे कॅमेरा अँगल लक्षात घेऊन संवाद साधतात आणि आवाजाचा प्रोब्लेम होऊ नयेत म्हणून माइक सुद्धा वापरतात. त्यामुळे बदल्यात काळाबरोबर टेक्नीकल गोष्टी सुद्धा आपण आत्मसात करायला पाहिजे हे यातून स्पष्ट होते.

Tags:    

Similar News