'चित्रलेखा' थांबलं..!

महाराष्ट्राच्या विचारविश्वात अनेक प्रकारे क्रांतिकारी आणि पथदर्शी प्रकाशन ठरलेलं चित्रलेखा साप्ताहिकाचा शेवटचा अंक या आठवड्यात प्रसिद्ध झाला आहे. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराज यांच्याशी याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे संवाद साधला असता त्यांनी 'आजकाल' शेवटच्या अंकातील शेवटच्या सदरात मांडलेली भूमिकाच अंतिम असल्याचे म्हटला आहे ती भूमिका खास Max Maharashtra च्या वाचकांसाठी...;

Update: 2022-12-16 12:22 GMT


 महाराष्ट्राच्या विचारविश्वात अनेक प्रकारे क्रांतिकारी आणि पथदर्शी प्रकाशन ठरलेलं चित्रलेखा साप्ताहिकाचा शेवटचा अंक या आठवड्यात प्रसिद्ध झाला आहे. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराज यांच्याशी याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे संवाद साधला असता त्यांनी 'आजकाल' शेवटच्या अंकातील शेवटच्या सदरात मांडलेली भूमिकाच अंतिम असल्याचे म्हटला आहे ती भूमिका खास Max Maharashtra च्या वाचकांसाठी...



 


दोन-चार फेल्या मारतो. तसं माझंही होईल. पण कधी तरी थांबलं पाहिजे!" म्हणून थांबतोय. खरं तर, 'चित्रलेखा'ला २०१४ मध्ये २५ वर्ष पूर्ण झाली, तेव्हाच 'चित्रलेखा' मालकांना स्वेच्छानिवृत्ती बद्दल सांगितले होते. पण तेव्हाच त्यांनी 'तुमच्या सारखा संपादक आणा आणि मोकळे व्हा', असे सांगितले. शोधाशोध सुरू केली. काहींना तयार करण्याचा प्रयत्न केला, ज्यांना 'चित्रलेखा'च्या कामाची माहिती आहे, तेही स्वतःहून संपादक पदाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे येईनात. वृत्तपत्राच्या पुढे जाणारी 'न्यूज वीकली' पत्रकारिता ही अधिक मेहनतीची आहे तशी मेहनत घेतल्यामुळे 'चित्रलेखा'चे अनेक रिपोर्ट रिपोतार्ज हे मराठी प्रिंट-टीव्ही मीडियाच्या खूप आधी प्रकाशित झाले आहे. असो. हे किती दिवस करायचे ? ते करण्यासाठी मला बजा करून स्वतःहून कुणी वेळीच पुढे आले असते, तर त्याकडे 'संपादकपदाची जबाबदारी नक्कीच सोपवली असती. आता ती वेल गेली आहे. 'कोरोना लॉकडाऊन' काळातही 'डिजिटल-चित्रलेखा' लाखो वाचकांपर्यंत नियमित पोहोचत होता. दिवाळी २०२० मध्ये छापील चित्रलेखा' सुरू झाल्यानंतरच्या पाच-दहा अंकानंतर मी 'चित्रलेखा'तून मोकळे होण्याचे निमित होते. पण ते परिस्थितीनुरूप लांबत राहिले, निरोप घेण्याचे निश्चित केले. पण त्यासाठी संचालकानी दिवाळीचा मुहूर्त ठरवला. तोही हुकला तेव्हा हा २६ डिसेंबरचा अंक शेवटचा हा माझा निर्णय पक्का ठरला. संचालक मनन कोटक यांची मी २०२३ च्या मार्च एंड पर्यंत अंक काढावेत अशी इच्छा होती. ती मला मान्य नव्हती, सेवाकाळ संपल्यानंतर गाळणं हे मनाला पटत नव्हते परंतु आपल्याबरोबर 'चित्रलेखा' ही थाबणार, हे वास्तव अस्वस्थ करणार होत. अर्थात, 'चित्रलेखा' थांबणं हे केवळ माझ्या थांबण्याशी संबंधित नाही. त्याला व्यावसायिक कारणही आहेत. धंद्यातली ही कारण पत्रकारितेचा धर्म चोखपणे पाळून संपवता येतात, असा माझा अनुभव आहे. म्हणूनच 'चित्रलेखा' गेली साडेतेहतीस वर्षे विनाखंड चालू

राहिला. 'चित्रलेखा'ने काय दिले, काय घडवले, हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. खूप माणसं, आणि घटना जवळून अनुभवल्यात. १९९६ पासून सलग २६ वर्ष लिहीत असलेल हे 'आजकाल' सदर तर बदलत्या महाराष्ट्राचा आणि बदलेल्या भारताचा इतिहास आहे. हेही सदर या शेवटच्या अंकासोबत थांबणार आहे. माझी लेखणी आणि वाणी कठोर असेल, पण मतलबी नाही. ज्याला त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीच ती कठोर झाली आहे. काही वेळा अनावधानाने कुणी दुखावलं गेलही असेल. इथे एक दंतकथा आठवते. एका शिपायाचा काही कारणाने असेल वा नसेल, राजाच्या अंगरख्यावर पाय पडला. त्याच वेळी राजा उठताच अंगरखा फाटला फार मोठा अपराध झाला होता. पण राजा शिपायाकडे नुसतंच जरबेनं बघत निघून गेला, पुढे कुठल्या तरी युद्धात हाच शिपाई राजा पुढं उभा राहिला. म्हणाला, 'ओळखलंत का? मी तो अंगरख्यावर पाय दिलेला माझ्यावर लक्ष ठेवा!' असं म्हणून तो शिपाई शत्रूच्या गर्दीत घुसला. सपासप तलवार चालवत पुन्हा दौडत राजापुढे आला आणि मुजरा करून म्हणाला, 'माझ्यावर लक्ष ठेवा!' पुन्हा शत्रूच्या फळीत घुसला. तलवार चालवून पुन्हा वेगाने परतला पुन्हा तो तेच म्हणाला, 'माझ्यावर लक्ष ठेवा अंगरख्यावर पाय दिलेला!" पुन्हा तडफेने शत्रूच्या गर्दीत घुसला. रक्तबंबाळ होऊन परतला आणि राजा पुढे उभा राहिला. तो तेच बोलण्याआधी राजा याला चोपटत म्हणाला, "असं जीवावर उदार होणारे साहस आता पुरे झालं अरे, माझा अंगरखा फाटलेला असेल, पण मन फाटलेलं नाही!" अशा मनाचे राजे ३८ वर्षांच्या पत्रकारितेत मला असंख्य लाभले. म्हणूनच मराठी स्वाभिमानावर हल्ला करणाऱ्या विरोधात माझी लेखणी तुटून पडू शकली. त्याला 'चित्रलेखा' व्यवस्थापनाची संपादकीय व अन्य विभागातल्या सहकान्यांची गावोगावच्या पत्रकार- फोटोग्राफर, व्यंगचित्रकारांची भरभरून साथ मिळाली. वाचक म्हणून तुमचे आभार मानण्याऐवजी कृतज्ञतापूर्वक तुमच्या चरणावर माथा ठेवतो! जय महाराष्ट्र! जय हिंद!

प्रिय

चित्रलेखा वाचक व अंक वितरक



 


२६ डिसेंबर २०२२

पुढील अंकापासून 'साप्ताहिक चित्रलेखा' (मराठी)चे प्रकाशन स्थगित करण्यात येत आहे. हा अंक शेवटचा आहे. वर्गणीदारांना उर्वरित अंकाची वर्गणी चेक / RTGS द्वारे पाठविण्यात येईल. याबाबत काही तक्रार असल्यास अंकातील चित्रलेखा कार्यालयाच्या पत्त्यावर अंक वितरण विभागाशी पत्र / फोनद्वारे संपर्क साधावा. आजवर आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार!

प्रकाशक: मौलिक कोटक

चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराज यांनी नुकतीच मॅक्स महाराष्ट्र कार्यालयाला भेट दिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नऊ एप्रिल 2022 रोजी मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेला आणि विजय गायकवाड यांनी घेतलेली मुलाखत दर्शकांसाठी

डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजाला काय दिले? - ज्ञानेश महाराव https://www.maxmaharashtra.com/max-videos/what-drambedkar-gave-to-indian-society-dnyanesh-maharao-1126018

Tags:    

Similar News